खडकवासला - खडकवासला धरण साखळी म्हणजे खडकवासला, पानशेत, वरसगाव टेमघर या चारही धरणात मागील २४ तासात सुमारे दीड टीएमसी पाणी जमा झाले आहे.
धरण साखळीत रविवार, तारीख २३ जुलै २०२३ रोजी सकाळी सहा वाजता या १५.१६ टीएमसी म्हणजे ५२ टक्के पाणीसाठा जमा झाले होते. आज सोमवार तारीख २४ जुलै २०२३ रोजी सकाळी सहा वाजता या १६.५७ टीएमसी म्हणजे ५६.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या २४ तासात धरण साठ्यात १.४१ टीएमसीची वाढ झालेली आहे.
दरम्यान जमा झालेल्या दीड टीएमसी पाण्यापैकी पानशेत आणि वरसगाव धरणात प्रत्येकी साडेपाचशे दशलक्ष घनफूट म्हणजे अर्धा टीएमसी पाणी वाढलेले आहे. त्याच कालावधीत पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांमध्ये अनुक्रमे १०४ व १०५ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. एक जून पासून २४ जुलै सकाळी सहा वाजेपर्यंत ते टेमघर येथे एक हजार २९३ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
खडकवासला धरण साखळीतील सकाळी सहा वाजताची स्थिती
धरणाचे नाव- २४ तासातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)/ एक जून पासूनचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)/ उपयुक्त धरण साठा टीएमसीमध्ये / टक्केवारी
खडकवासला- २५ / २०८ / १.४४ / ७२.८३
पानशेत- १०४ / ८४४ / ६.४७ / ६०.७४
वरसगाव- १०५ / ८५६ / ७.२२ / ५६.३३
टेमघर- ७० / १२९३ / १.४४ / ३८.९४
चार ही धरणात मिळून १६.५७ टीएमसी म्हणजे ५६.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.