मुलीचे चुंबन घेणाऱ्या डिलीव्हरी बॉयविरोधात हिंदू महासभा आक्रमक; केली 'ही 'मागणी

Anand dave
Anand daveSakal
Updated on

पुणे : फूड डिलीव्हरी बॉयने पुण्यात एका मुलीचा विनयभंग केल्यानंतर हिंदू महासभा आक्रमक झाली असून कंपनी आणि सरकारकडे कर्मचाऱ्याच्या माहितीची मागणी केली आहे. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करताना डिलीव्हरी बॉयचे नाव आणि त्याची माहिती ग्राहकाला देण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे.

(Pune Crime News Updates)

दरम्यान, सोमवारी पुण्यात एका फूड डिलीव्हरी बॉयने ऑर्डर द्यायला आल्यावर मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वातावरण तापलं असून काल पोलिसांनी डिलीव्हरी बॉयला अटक केली होती. रईस शेख (४०) असं या डिलीव्हरी बॉयचे नाव असून येवलेवाडी येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

Anand dave
Earthquake : रशियात भूकंप, एकाचा मृत्यू; घटनेचा थरारक Video आला समोर

फूड डिलीव्हरी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव कंपनीने ग्राहकांना अगोदर द्यावे, त्यानंतर ग्राहकांना ऑर्डर कन्फर्म करण्याची परवानगी असावी अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. फक्त ग्राहकांच्या नावामुळे त्याचे घर, पार्श्वभूमी अशी माहिती उघड होते त्यामुळे गुन्हेगारीला उत्तेजन मिळू शकते असं मत दवे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर या सेवेसाठी आणि गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी वेगळी नियमावली तयार करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

काय होतं प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, रईस शेख (वय ४०) असं आरोपी फूड डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. १९ वर्षांची पीडित तरुणी एका नामांकित कंपनीत कामाला असून तिने रात्री उशीरा येवलेवाडी इथल्या आपल्या घरी परतल्यानंतर जेवण मागवलं होतं. पार्सलची डिलिव्हरी घेऊन रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीत दाखल झाला. जेवणाचं पार्सल तरुणीकडं देत त्यानं तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर थँक्यू म्हणण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा हात पकडत आपल्याकडं ओढलं आणि तिच्या गालावर दोन वेळा चुंबन घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.