Pune : लोकशाही ही केवळ मतदानासाठी नाही. लोकशाहीकडे नव्याने पाहणे गरजेचे; माजी प्रधान सचिव महेश झगडे

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, शारदानगर (ता.बारामती) येथे परिवर्तन व्याख्यानमालेत ``लोकशाहीतील शासन आणि प्रशासन,`` या विषयावर माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
माजी प्रधान सचिव महेश झगडे
माजी प्रधान सचिव महेश झगडे sakal
Updated on

Pune - लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीने कोणतेही दडपण न घेता कायद्याने ठरून दिलेल्या कामांची अंमलबजावणी केली तर सर्वसमान्यांची कामे वेगाना मार्गी लागतात. हा माझा अनुभव आहे.  सामाजिक परिवर्तन करण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही. आपल्यालाच एकत्र येऊन सांघिक स्तरावर लढा द्यावा लागणार आहे, असे आवाहन माजी प्रधान सचिव (महाराष्ट्र शासन) महेश झगडे यांनी शारदानगर येथील परिवर्तन व्याख्यानमालेत केले.

माजी प्रधान सचिव महेश झगडे
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, शारदानगर (ता.बारामती) येथे परिवर्तन व्याख्यानमालेत   ``लोकशाहीतील शासन आणि प्रशासन,`` या विषयावर माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  समाजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव, विचार समान्यांपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून पोचवेत, या उद्देशाने अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था परिवर्तन व्याख्यानमाला चालवित आहे.

त्यानुसार या परिवर्तन व्याख्यानमालेतील ११२ पुष्प महेश झगडे यांनी गुंफले. यावेळी अॅग्रीकल्चर ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार,  विश्वस्त सौ. सुनंद पवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी निलेश नलवडे, मानवी संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता, शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.व्ही.महामुनी, समन्वयक प्रशांत तनपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

माजी प्रधान सचिव महेश झगडे
Mumabi Crime : कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांची दादागिरी

दरम्यान, तरुण पिढीने सक्रिय होऊन चुकीच्या गोष्टी थांबवल्यासह नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके वेगवान व्हायला वेळ लागणार नाही,  असे सांगून महेश झगडे म्हणाले,`` लोकशाही ही केवळ मतदानासाठी नाही. लोकशाहीकडे नव्याने पाहणे गरजेचे आहे.अलिकडच्या काळावात लोकशाहीला उतरती कळा लागली असून यात चेतना आणि संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे.

माजी प्रधान सचिव महेश झगडे
Mumbai : विठ्ठला....! झोपलेल्या सरकारला जागे कर; टाळ-मृदंग वाजवून शेतकऱ्यांचे आंदोलन

लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही ही रथाची दोन चाके आहेत आणि हा रथ म्हणजे शासन होय. शासन सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाला योग्य तो न्याय दिल्यास अच्छे दिन यायला वेळ लागणार नाही.`` तत्पुर्वी प्रास्ताविक करताना प्राध्यापक आर.बी. देशमुख यांनी महेश झगडे यांच्या जीवनातील वैविध्यपूर्ण घटना आजच्या युवापिढीला प्ररणादायी ठरतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.