नगररोड भागात डेंग्यूचा उद्रेक; अनेक जणांना डेंग्यू सदृश ताप

नगररोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस दिवस वाढ होत आहे.
नगररोड भागात डेंग्यूचा उद्रेक; अनेक जणांना डेंग्यू सदृश ताप
sakal
Updated on

रामवाडी : नगररोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस दिवस वाढ होत आहे. पावसाचे पाणी रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कप अडगळीच्या साहित्यात पाणी साठून डास उत्पत्ती होत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालया च्या हद्दीत 13 डेंग्यूचे रुग्ण आढळले तर 133 पेक्षा जास्त जणांना डेंग्यू सदृश ताप येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नगररोड भागात डेंग्यूचा उद्रेक; अनेक जणांना डेंग्यू सदृश ताप
संधी करिअरच्या... : नर्सिंगमधील उज्ज्वल भवितव्य

पावसाचे पाणी हे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ,बॅरल, कुंड्यांमध्ये तसेच प्लॅस्टिकचे चहाचे कप, शहाळे, फ्रिज खालील ट्रे मध्ये, फुलदाणी, कुलर , घराच्या छतावरील अडगळीच्या साहित्य मध्ये साचून मोठ्या प्रमाणात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यू सदृश्य ताप असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. खासगी रुग्णालय व दवाखाने रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांमध्ये डेंग्यू सदृश लक्षणे आढळून आली आहे.

सर्दी , खोकला ,ताप, अंगदुखी ,थकवा ,भूक मंदावणे, मळमळ, पोटदुखी, असे लक्षणे रुग्णांमध्ये दिसुन येत आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या आळीच्या उत्पत्तीकेंद्रे या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच या बाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.पालिकेकडून डेंग्यू विषयी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. - संजीव वावरे : सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा

नगररोड भागात डेंग्यूचा उद्रेक; अनेक जणांना डेंग्यू सदृश ताप
रि-स्किलिंग : महत्त्व सादरीकरणाचे...

जुलै ते सप्टेंबर महिन्यात नगररोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 13 जणांना डेंग्यूची लागण झाली तर जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यात 133 जणांना मध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळून आली आहे. पालिकेकडून उपाययोजना सुरू आहे. पाणी साचून डेंग्यू डासोत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या नगररोड भागातील मोठ्या इमारती, बांधकाम साईड यांना प्रथम पालिके कडून सूचना दिल्या जातात.

नियमांचे पालन न करणार्‍यां वर कारवाई करीत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1 जुलै ते 23 सप्टेंबर पर्यत 32,300 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे मिलिंद घाटे प्रभारी एम एस आय किटक प्रतिबंधक विभाग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.