पारगाव : धामणी आंबेगांव येथील कुलदैवत श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाचे मूळ स्थान असलेल्या सागदर्याडतील पाऊतक्यावर धामणीच्या मुख्य देवस्थान मंदिरात असलेल्या मूर्तीप्रमाणे श्री म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या व नंदी.कासव व देवाचा श्वानाच्या मूर्तीची नुकतीच धार्मिक विधी,होमहवन करुन प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
या सर्व सर्वांगसुंदर विलोभनीय मूर्ती "काळा पाषाण नावाच्या उच्च प्रतिच्या टिकाऊ दगडातून राजस्थान येथून तयार करुन आणलेल्या आहेत या सगळ्या मूर्ती शिरदाळे येथील खंडोबा भक्त कै. दत्तात्रय हबाजी तांबे यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजिव शंकर दत्तात्रय तांबे यांनी अर्पण केल्या आहेत या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला धामणी शिरदाळे.पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती चिंचबाईवाडी,टाकळकरवाडी,गाडकवाडी येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या तीनही मूर्तीची शिरदाळे येथे वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली
कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा देव तत्कालीन खंडोबा भक्त तांबे बाबा यांच्या प्रेमाखातर निमगावहून धामणी शिरदाळे येथे येत असताना खरोखर खंडोबादेव आपल्या पाठीमागे येत आहे की नाही ? हे पाहाण्यासाठी भक्त तांबेबाबा यांनी पाठीमागे वळून पाहिले त्या ठिकाणी खंडोबा अंतर्धान पावले व त्या ठिकाणी खंडोबाभक्त तांबे बाबांना सागाचे रोपट्याचा उगम झालेले सागाचे झाड आढळून आले
अशी आख्यायिका सांगितली जाते. याच परिसरात नंतर सागांच्या झाडाचे बन तयार झाले व त्या ठिकाणाला तेव्हापासून "सागदरा" हे नाव सुपरिचित झाले या सागदऱ्यातील झाडे कोणीही तोडत नाही सागाचे पानाला सुध्दा हात लावला जात नाही अशी आख्यायिका असल्याचे सांगण्यात येते ब्रिटीशाच्या राजवटीत एका ब्रिटीश उच्चपदस्थ फाँरेस्ट अधिकार्याखने सागदऱ्यातील सागाची झाडे तोडण्याचे आदेश काढले व सागाची झाडे तोडण्यासाठी मजूरासह मोठा लवाजामा घेऊन सागदऱ्यात आले त्यांनी सागाची झाडे तोडण्यास सुरुवात केली त्याबरोबर ब्रिटीश अधिकाऱ्यासह सर्व मजूरांच्या पोटात वेदना होऊन ते अक्षरश: जमिनीवर गडबडा लोळू लागले काही
जणांना तर उलट्या होऊ लागल्या त्यावेळी तत्कालीन गावकर्यांनी त्या ब्रिटीश अअधिकाऱ्या खंडोबाची महती सांगितली त्यानंतर त्या ब्रिटीश अधिकाऱ्याने सरकारी गँझेटमध्ये या सागदऱ्यातील सागाची झाडे ही देवराई आहे त्याला कोणीही हात लावू नये त्याचे रक्षण करावे असे आदेश काढले त्याची नोंद सरकारी दप्तरी असल्याचे सांगण्यात येते शिरदाळे येथील ग्रामस्थांनी या सागदऱ्यात जाण्यासाठी दगड सिमेंटचा वापर करुन भक्कम पायऱ्या बांधलेल्या आहेत तसेच
पायऱ्या च्या दोन्ही बाजूनी लोंखडी सरंक्षक पाईप बसवलेले आहेत शिरदाळे ग्रामस्थ या सागदऱ्यातील पाऊतक्याची दररोज नित्यनेमाने पुजा आरती करतात त्यांनी या मूळस्थानाची चांगल्या प्रकारे देखभाल व्यवस्था ठेवलेली आहे दर पोंर्णिमेला खंडोबाची पालखी या ठिकाणी काढण्यात येत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.