Dhol Tasha : पुण्यातील ढोल-ताशा पथकांमध्ये आनंद; सर्वोच्च न्यायालयाने पथकातील सदस्य संख्येवरील हटविले निर्बंध

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले.
Dhol tasha
Dhol tashasakal
Updated on

पुणे - विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले आहे. तसेच सदस्य संख्येवर निर्बंध नसले, तरी मिरवणुकीला लागणारा वेळ आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करता पथकांतील सदस्य संख्या मर्यादित ठेवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विविध पथकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.