Pune : दोन हजार दिव्यांग बांधवांना उपकरणाचे वाटप; फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मुरलीधर मोहोळांचा उपक्रम

यासोबतच दिव्यांग रोजगार नोंदणी व मार्गदर्शन शिबीर आणि कृत्रिम अवयव मोजमाप तसेच नोंदणी शिबीरही संपन्न झाले.
Pune
PuneSakal
Updated on

मयुर कॉलनी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दिव्यांग सहाय्यता अभियानाचे’ आयोजन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानचे उदघाटन झाले.

हृदयस्पर्शी सोहळ्यात दिव्यांगाना उपकरणचे वाटप करण्यात आले. अभियानांतर्गत मदतीचा हात म्हणून २ हजार दिव्यांग बंधु-भगिनींना व्हिलचेअर, कुबड्या,वॅाकर, स्टिक, अशा अनेक प्रकारच्या सुसह्य उपकरणांचे वाटप करण्यात आले. यासोबतच दिव्यांग रोजगार नोंदणी व मार्गदर्शन शिबीर आणि कृत्रिम अवयव मोजमाप तसेच नोंदणी शिबीरही संपन्न झाले.

Pune
Pune : अनुदानापासून वंचित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत; मंत्री दिलीप वळसे पाटील

खाजगी रूग्णालयात ६० हजार रूपयांना बसवला जाणारा पाय आणि २५ हजार रूपयांना बसवला जाणारा हात या अभियानाच्या माध्यमातून गरजवंताना मोफत दिला जाणार आहे. कार्यक्रमास भारत विकास परिषद , नॅशनल एच आरडी नेटवर्क, दीपगृह सोसायटी व एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.

Pune
Mumbai-Goa Highway: आता मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून करा बिनधास्त प्रवास; प्रशासनानं 'या' सुविधा केल्या उपलब्ध

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सिनेअभिनेते प्रवीण तरडे, योगेश टिळेकर, हेमंत रासने, रवी असानपुरे, श्रीनाथ भिमाले, दीपक पोटे, उज्ज्वल केसकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, आनंद रिठे, राजेश येनपुरे, प्रसन्न जगताप, अजय खेडेकर, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, राहुल भंडारे, धनराज घोगरे, राजेंद्र शिळीमकर, संदीप खर्डेकर, आदित्य माळवे, आबा तुपे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()