पुणे : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी

यासाठी येत्या सोमवारपासून (ता. २४) जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये खास आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
Child
Childsakal
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बालकांची पुन्हा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या सोमवारपासून (ता. २४) जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये खास आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या तपासणीत पुढील उपचाराची किंवा शस्त्रक्रियेची गरज भासणाऱ्या बालकांवर पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. (Cheaking of Child in Pune District)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने संयुक्तपणे करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ५ हजार १८० बालकांना विविध दुर्धर आजारांनी ग्रासले असल्याचे आढळून आले होते. यामधील सर्वाधिक १ हजार ४८८ बालकांना कान, नाक, घसा (ईएनटी) आणि श्रवण दोष असल्याचे दिसून आले आहे.

Child
पुण्यात ओमायक्रॉनचा कहर; एका दिवसात तब्बल १२५ रुग्ण

या तपासणीसाठी यंदा डायग्नॉस्टिक सपोर्ट सिस्टीमचा (अचूक रोगनिदान करणारी प्रणाली) वापर करण्यात आला. आतापर्यंत वजन व उंचीच्या आधारे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून या आजारांचे निदान केले जात असे. परंतु या नव्या प्रणालीमुळे जिल्ह्यातील बालकांमधील विविध दुर्धर आजारांचे अचूक निदान होण्यास मदत झाली आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे रोगनिदान करण्यात आले. या अचूक रोगनिदान प्रणालीमध्ये विविध ३६ प्रश्‍न फीड करण्यात आले होते. या प्रश्‍नांची उत्तरे पालक आणि विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्यात आली. या मिळालेल्या उत्तरांच्या आधारे हे रोगनिदान झाल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.२०) सांगितले.

Child
प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यास प्रशासनाची परवानगी

आजारनिहाय बालकांची संख्या

  • त्वचारोग ५६७

  • जन्मतः व्यंग किंवा दोष २३७

  • श्रवणदोष (कान, नाक, घसा विकारांसह) १४८८

  • शारिरिक दुर्बलता १३७०

  • बालपणीचे आजार ३२६

  • नेत्रदोष ११९२

  • एकूण ५१८०

पुणे जिल्ह्यातील विविध दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या बालकांची येत्या २४ जानेवारीपासून तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाणार असून, यासाठी सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये बालकांसाठी खास आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या तपासणीत गरज भासल्यास या बालकांवर पुण्यातील ससूनसह नामवंत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()