पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; पाणीसाठ्यात किंचित वाढ

पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी जोरदार पाऊस झाला. परंतु धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.
rain
rainsakal
Updated on

पुणे - जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी जोरदार पाऊस झाला. परंतु धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून सध्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग बंद आहे.

भीमा खोऱ्यातील सर्व २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (ता. १) सरासरी १५ ते ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच, जिल्ह्यातील काही तालुक्यांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पामध्ये बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २६.२८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. आज गुरुवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पामध्ये २६.२६ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी १ डिसेंबरअखेर या प्रकल्पात २७.७६ टीएमसी पाणीसाठा होता. तर, उजनी, कळमोडी आणि चासकमान या तीन धरणांत सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे.

rain
पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला पुन्हा वेग

प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये, टक्केवारी आणि कंसात पाऊस मिलीमीटरमध्ये

टेमघर ३.५१ ९४.६१ (२५)

वरसगाव ११.३८ ८८.७८ (८५)

पानशेत १०.४६ ९८.२३ (८९)

खडकवासला ०.९० ४५.७२ (८५)

नीरा देवधर ११.७० ९९.७८ (७१)

भाटघर २३.२९ ९९.१२ (८६)

वीर ७.४० ७८.६५ (८६)

उजनी ५३.५७ १०० (१५)

डिंभे ११.३४ ९०.७७ (९४)

कळमोडी १.५१ १०० (८४)

चासकमान ७.५७ १०० (७३)

भामा आसखेड ६.७६ ८८.१९ (८२)

पवना ७.४२ ८७.१५ (६०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.