पुणे - पुणे जिल्ह्यातील टाटांची सहा धरणे वगळता उर्वरित २६ धरणांमधील मिळून एकूण पाणीसाठा हा शनिवारी (ता.२२) ६१.२१ टीएमसी इतका झाला आहे. या धरणांमधील पाणी साठ्याचे हे प्रमाण एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या केवळ ३०.८६ टक्के इतके झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा असलेले उजनी धरण अद्यापही मायनसमध्येच असून, आतापर्यंत केवळ एकच धरण १०० टक्के भरले आहे. याशिवाय तीन तीन अद्यापही कोरडी ठणठणीत आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील कलमोडी हे एकमेव धरण पूर्ण भरले असून, या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा १.५१ टीएमसी इतका आहे. गेल्या वर्षीच्या या तारखेच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठा हा सुमारे निम्म्याहून कमी झाला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या या तारखेपर्यंत या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण १३७.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
गतवर्षीच्या या तारखेपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्याचे प्रमाण ६९.२८ टक्के इतके होते, असे जलसंपदा विभागाच्यावतीने शनिवारी (ता.२२) प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणातील पाणीसाठा आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
याशिवाय टाटांच्या मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण आणि लोणावळा आणि कुंडली या सहा धरणांमध्ये मिळून २०.६८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. या धरणांमधील पाणीसाठ्याचे हे प्रमाण ४८.३९ टक्के इतके झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती.
शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे.
खडकवासला ‘प्रकल्पा’त १४.११ टीएमसी पाणी
दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून आजअखेपर्यंत एकूण १४.११ टीएमसी पाणी जमा झाले आहे. गत वर्षीच्या या तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये एकूण २०.०१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यावरून या चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५.८८ टीएमसी कमी पाणी साठले असल्याचे जलसंपदा विभागाच्या धरणसाठा आकडेवारी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
प्रमुख धरणांमधील आजअखेरचा साठा (टीएमसीमध्ये)
- माणिकडोह--- २.४१
- येडगाव --- ०.८३
- वडज --- ०.५५
- डिंभे --- ४.०४
- चासकमान --- ३.८३
- भामा आसखेड --- ३.६७
- आंद्रा --- १.७१
- पवना --- ४.५६
- वरसगाव --- ६.२६
- पानशेत --- ५.४२
- खडकवासला --- १.२३
- गुंजवणी --- १.५८
- भाटघर --- १०.३१
- वीर --- ३.७७
- टेमघर --- १.२१
- नीरा देवघर --- ६.३४
टाटांच्या धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
- मुळशी --- ९.०२
- ठोकरवाडी --- ६.३९
- शिरोटा --- ३.३७
- वळवण --- १.३५
- लोणावळा --- ०.३२
- कुंडली --- ०.२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.