जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे; मागेल त्याला रोजगार हमीतून गोठा

जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे; मागेल त्याला रोजगार हमीतून गोठा
Updated on

पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्ह्यात यंदापासून हरघर गोठे, घरघर गोठे ही नवी योजना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात मागेल त्याला गोठा देण्यात येणार आहे.

यानुसार गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबडी पालन करण्यासाठी आवश्यक गोठा बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (ता.१) सांगितले.

सध्या राज्यात केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्य पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. गाई-म्हशींच्या गोठ्याचे शेड बांधण्यासाठी राज्य पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याला आता केंद्र पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून गोठ्यात सिमेंट क्राॅंक्रिटचे पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी यासाठी आणि आणखी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान मिळू शकणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय महिला बचत गटांना सामुहिक गोठे निर्माण करण्यासाठी, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी आदींना शेड बांधण्यासाठीही या योजनेंतर्गत गोठा अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.