Pune Metro: पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन उद्या पाच तास राहणार बंद! जाणून घ्या कधी होणार सुरु

नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
Pune Metro
Pune Metro Sakal
Updated on

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन पाच तास बंद असणार आहे. सायंकाळी सात नंतर हे स्टेशन प्रवाशांसाठी खुले केले जाईल.

तसेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मार्ग उद्या (ता. २६) रात्री ८. ३० ते १० असा नागरिकांसाठी खुला असेल, शुक्रवार पासून नियमीत सेवा सुरु होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

मोफत पीएमपी सेवा

मोदी यांच्या दौऱ्यामुळे उद्या दुपारनंतर जिल्हा न्यायालय स्टेशन काही काळ बंद असणार आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारनंतर पिंपरी ते शिवाजीनगर असा मार्ग सुरू राहील. मेट्रो जिल्हा न्यायालयापर्यंत जाणार नाही, त्यामुळे प्रवाशांना शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर उतरावे लागेल. तेथून पुणे महापालिकेपर्यंत पीएमपीचा मोफत प्रवास करता येणार आहे.

रामवाडी ते वनाज मेट्रोला बाधा नाही

दुपारनंतर रामवाडी ते वनाज ही मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. फक्त जिल्हा न्यायालय स्टेशन बंद दुपारनंतर बंद असणार आहे. ज्या वनाज किंवा रामवाडीवरून येणाऱ्या प्रवाशांना पिंपरीच्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्यांनी पुणे महापालिका स्टेशनवर उतरावे. तेथून मोफत बसने शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला जावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. मेट्रो मार्गिकेचे उद्‍घाटन झाल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर सेवा पूर्ववत होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.