पुणे/खळद : ‘‘पुरंदर (purandar) तालुक्यातील झिका विषाणू (zika virus) संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य पथकांकडून देण्यात आली. या पथकाकडून गुरुवारी (ता.५) बेलसर गावची (ता. पुरंदर) पाहणी केल्यानंतर पथकाचे प्रमुख डॉ. हिंमतसिंह पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.(pune district zika under control Central Health Squad)
राज्यातील पहिला झिका रुग्ण बेलसर येथे आढळला होता. तेव्हापासून सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. येथील आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने ही परिस्थिती संवेदनशील पद्धतीने हाताळली आहे. हे समाधानकारक असल्याचे मतही यावेळी पथकाने व्यक्त केले.
या पथकात डॉ. पवार, डॉ. नैन शिल्पी, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे डॉ. मंगेश गोखले यांचा समावेश आहे. पथकासमवेत राज्य आरोग्य विभागातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय बेंद्रे, राज्य आरोग्य विभागाचे डॉ. महेंद्र जगताप, डॉ. प्रणील कांबळे आदी अधिकारी होते. यावेळी आमदार संजय जगताप, नंदकुमार जगताप, अमर माने, उज्ज्वला जाधव, डॉ. भरत शितोळे, डॉ. सागर डांगे, अर्जुन धेंडे, धीरज जगताप, आर. एन. शेळके, नीलेश जगताप, कैलास जगताप आदी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य बेलसर आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
पुरंदर तालुक्यात झिकाचा रुग्ण सापडला असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. - संजय जगताप, आमदार
पथकाने सुचविल्या प्राथमिक उपाययोजना
झिकाचा डास दिवसा चावतो, त्यामुळे पूर्ण कपडे वापरावेत
शरीराला ओडोमाससारखे डास प्रतिबंधक मलम लावावेत
गर्भवती व लहान मुलांनी आपापले डासांपासून संरक्षण करावे
पाण्याची साठवणूक करू नये
गर्भवतींची अधिक काळजी घ्यावी
झिकाच्या संसर्गापासून गर्भवतींना जास्त धोका संभवतो. गर्भवती बाधित झाली तर तिच्यापासून बाळाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे जन्मणाऱ्या बाळाला मंदबुद्धीसारख्या आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्भवतींनी याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे या पथकातील सदस्या डॉ. नैन शिल्पी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.