Pune - ‘सातगाव पठार (ता.आंबेगाव) भा गाला वरदान ठरणाऱ्या कळमोडी धरण प्रकल्पासाठी १९८ कोटी ४९ लाख रुपये किमतीस प्रथम सुधारित मान्यता देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर तपासणीस असून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
असे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुक्रवार (ता.२ जून) रोजी दिले आहे. ही वस्तुस्थिती आहे.
उपोषणाचा देखावे करणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांचा उपमुख्यमंत्री फडवाणीस यांच्यावर विश्वास नाही का? याचे उत्तर त्यांनी प्रथम जनतेला द्यावे.” असा हल्लाबोल मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केला.
मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह (ता.आंबेगाव) शिरूर व खेड तालुक्यातील गावांना मिळावे.या मागणीसाठी दरेकर यांच्या नेतुत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६जून) पासून उपोषणाला बसले आहेत.
या पार्श्वभूमीवर पेठ (ता. आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी (ता.१) पानसरे यांनी दरेकर यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशांत नवले,सुनील तोत्रे, जितेंद्र तोत्रे,भानुदास कराळे,अविनाश कराळे, राहुल कराळे ,राजू तेली,अक्षय भागडे,सिद्धेश चिखले आदी शेतकरी उपस्थित होते .
पानसरे म्हणाले “सातगाव पठार भागात पाऊस झाल्यानंतर वेळ नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम तसेच पेठ येथे वीज उपकेंद्र ही कामे वळसे पाटील यांनी मार्गी लावली आहेत. कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार भागाला मिळावे, म्हणून वळसे पाटील अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत.
तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ता.३० ऑक्टोबर २०२२ रोजी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार कार्यवाहीचे पत्र फडणवीस यांनी दिल्याचे समजल्यानंतर दरेकर व त्यांच्या नेत्याच्या पोटात गोळा आला.याकामाचे श्रेय वळसे पाटील यांना जाऊ नये म्हणूनच उपोषणाचा स्टंट त्यांनी सुरु केला आहे. पण त्यांना यश येणार नाही.”
“आझाद मैदान मुंबई येथे देविदास दरेकर यांचे स्वत:च्या सरकारच्या विरोधात गेली सहा दिवस उपोषण सुरु आहे.दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे काम मार्गस्थ झाले आहे. तरी दरेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी उपोषणाचा घाट घातला आहे.
हे आत्ता राज्य सरकाच्याही लक्षात आले आहे. त्यांच्या आंदोलनाला अधिकारी तर दूरच पण मंत्रालयातील शिपाई देखील उपोषण स्थळाकडे फिरकला नाही. त्यामुळे त्यांची शासन दरबारी किती किंमत आहे.हे जनतेला कळले आहे.”
सुशांत नवले, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आंबेगाव तालुका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.