नारायणगाव : कांदळी वडामाथा येथील उसाच्या शेतीलगत बांधावर असलेल्या १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्राला लागलेली आग आदर्श ग्रामपंचायत कांदळीचे लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
या बाबत माहिती आशी, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कांदळी वडामाथा येथील आशा जनार्धन रेपाळे व राजाराम घाडगे यांच्या उसाच्या बांधावर असलेल्या १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्राला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या बाबतची माहिती सरपंच भोर यांना मिळाल्या नंतर त्यांनी तातडीने त्या विभागाचे काम पहाणाऱ्या वायरमनाला फोन करून घटनेची माहिती देवून रोहित्राचा वीज पुरवठा तातडीने बंद करण्याची सूचना केली. त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईलद्वारे संपर्क साधून कर्मचाऱ्यांना अग्निशामक बाटला घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी झाडाच्या फांद्यानी आगा विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत चालली. दरम्यान पाचच मिनिटात ग्रामपंचायत कर्मचारी अग्निशामक बाटला घेऊन आले.
सरपंच विक्रम भोर यांनी अग्निशामक बाटलीतील कार्बनडाय ऑक्साईड चा फवारा मारून आग विझवली. या मुळे आग लागून या भागातील उसाचे संभाव्य नुकसान टाळले. आग विझवण्यासाठी सरपंच भोर यांना महावितरण चे वायरमन बाळू केकान, विशाल घुले, शुभम आरोटे, ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम गुंजाळ, रणजीत चव्हाण, अक्षय कुतळ, ग्रामस्थ संदीप घाडगे, दिपक गोपाळे यांनी मदत केली.
या भागातील वीज वाहक तारा, रोहित्राच्या केबल जुन्या झाल्या आहेत. रोहित्राच्या खाली गवत वाढले आहे. या मुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. महावितरणकडून वीज बिलाची वसुली केली जाते. मात्र देखभाल दुरुस्तीची कामे केली जात नाही.
- विक्रम भोर, लोकनियुक्त सरपंच कांदळी, ता.जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.