पारगाव : आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील लोणी -धामणी परिसरातीलआठ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना कागदावरून आता प्रत्यक्ष स्वरूपात येताना दिसत असून या योजनेच्या प्रत्यक्ष ड्रोन सर्वेक्षणाचा आज शुक्रवार पासुन सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या पुढाकाराने परिसरातील आठ गावचे सरपंच, उपसरपंच तसेच महत्वाचे पदाधिकारी यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली होती.
तसेच लोणी या ठिकाणी झालेल्या बैठकीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेचा समावेश कुकडी प्रकल्पात करण्यात आला होता तसेच जून ,जुलै महिन्यात या योजनेच्या सर्वेक्षणासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आता सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून सर्व गावांचा 15 दिवस ग्राऊंड सर्वे सुरू असून हा सर्वे योगेश्वर असोसिएट या कंपनी मार्फत सुरू आहे. आज शुक्रवारी या सर्वेचा पुढचा टप्पा म्हणजे ड्रोन सर्वे ला सुरवात करण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून आठही गावांचा सर्वे करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठवून त्यानंतर प्रत्यक्ष लागणारा निधी या योजनेवर पडण्यास चालना मिळणार असून ही योजना प्रत्यक्षांत येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी शरद सहकारी बँक संचालक अशोक आदक पाटील,बाळशीराम वाळुंज,उद्धवराव लंके,शिरदाळेचे उपसरपंच मयुर सरडे,राजु वाळुंज,गणेश तांबे,अजित बोऱ्हाडे,चंद्रकांत गायकवाड ,महेश वाघ , आठ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.