Pune Drugs Case: पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. पुणे ड्रग्स प्रकरणी आता संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. धुनिया आणि ड्रग्स प्रकरणी तपासात आता केंद्रीय यंत्रणा देखील सहभागी होणार. एनआयए, एनसीबी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणा सुद्धा या प्रकरणात सहभागी होतील.
संदीप धुनिया पाटणा येथून नेपाळमधील काठमांडू आणि तिथून कुवैतला पळून गेल्याची संशय पुणे पोलिसांना आहे. या रॅकेट मध्ये टेरर फंडिंग, अंडरवर्ल्ड आणि हवाला रॅकेट संबंधी तपास देखील केला जाणार.
पुणे पोलिसांनी मोठ्या कारवाईत 3276 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या वर्षात महाराष्ट्र पोलीस आणि भारतातील कोणत्याही शहरातून अमली पदार्थ जप्त करण्याचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1688 किलो एमडी ड्रग्ज सापडले आहेत. (Pune Crime News)
मंगळवारी पोलिसांनी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील दोन गोदामांवर आणि एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकून ६०० किलो 'म्याव-म्याव' ड्रग्स जप्त केले. याच प्रकरणात दिल्लीतील गोदाम आणि इतर भागांतून आणखी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. (Pune Police News)
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पुणे आणि दिल्लीतील प्रत्येकी तीन जणांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतही छापे टाकले. अनेक जण पुणे पोलिसांच्या चौकशीत असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.