Pune Drugs Case: फर्ग्युसन रस्त्यावरील पब पहाटेपर्यंत सुरू कसे? पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओनंतर खळबळ, पुणेकरांचा संताप!

Pune Drugs Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाई केली जात आहे. असे असतानाही फर्ग्युसन रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकाजवळ असलेल्या एल ३ हा पब रविवारी पहाटे पाचपर्यंत सुरू होता.
Pune Drugs Case
Pune Drugs Caseesakal
Updated on

पुणे , ता. २३ : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्वीड लीजर लाउंज हा पब, बार पहाटे उशीरपर्यंत सुरू असल्याचे तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले.पोलिसांनी याप्रकरणी पब, बार चालक, मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले, त्यांना अटक करण्याची कारवाई रात्री उशीरपर्यंत सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात संबंधित पब, बार सील केला असून दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे

निलंबनही करण्यात आले आहे.

संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र गिराफे, उत्कर्ष देशमाने अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चालक, मालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी पब, बार व्यावसायिकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार (कलम १८८) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशीरपर्यंत सुरू होती.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित पब,बार तत्काळ सील केला.

कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणीनगरसह शहरातील विविध भागातील पबवर कारवाई सुरू केली होती. त्यानंतरही फर्ग्युसन रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकाजवळ असलेल्या लिक्वीड लीजर लाउंज (एल ३) हा पब, बार रविवारी पहाटे पाचपर्यंत सुरू होता. तेथे तरुण- तरुणी मद्यपान करत होते.

तसेच या पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीच्यावेळी काही तरुण स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ रविवारी सकाळी व्हायरल झाला होता. फर्ग्युसन महाविद्यालय सारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी हा सर्व प्रकार घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र गिराफे, उत्कर्ष देशमाने या मालक, चालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांकडून संबंधित पब, बार ही तत्काळ सील करण्यात आला. तर व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेला पदार्थ हा अमली पदार्थ आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या गंभीर घटनेनंतर रात्र गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलचे निलंबन करण्यात आले आहे. (Pune Crime News)

Pune Drugs Case
Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्ज पार्टी झालेले एफसी रोडवरील हॉटेल कोणते? दोन जण ताब्यात

----

"फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एल ३ नावाचा पब शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दोन मालकांनी हा पब तिघांना चालविण्यास दिला होता. शनिवारी रात्री १.३० वाजल्यानंतर ही पार्टी सुरू होती. तेथे अमली पदार्थ होता की नाही, याची चौकशी केली जात आहे. बार सिल करण्यात आला आहे. काही जणांना ताब्यात घेतले आहे, तर दोन पोलिसांचे निलंबन केले आहे." संदीप सिंग गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

----

"लिक्वीड लीजर लाउंजवरील कारवाईत आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे, अटकेची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे." चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.

---

Pune Drugs Case
Pune Drugs News : पुण्यात ड्रग्जची मालिका सुरुच, नामांकित हॉटेलमधील पार्टीचा |Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.