Pune Drugs Case: 'एल थ्री'मधील पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्याला पुणे पोलिसांकडून बेड्या

L3 Drugs Party: पुण्यात घडलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाने याबाबत मोठी कारवाई सुरू केली आहे.
Pune Drugs Party
Pune Drugs PartyEsakal
Updated on

पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावरील एल थ्री हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या पेडलरला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अभिषेक असे या ड्रग पेडलरचे नाव आहे. गेल्या आठवड्या या हॉटेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोन तरूण हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचे सेवन करत असल्याचे दिसत होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कडक पाऊले उचलत त्या तरुणांना अटक केली होती. याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी हॉटेलवर कारवाई केली होती.

दरम्यान पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पार्टीला उपस्थित असणाऱ्या ४० ते ४५ मुलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांनी त्या रात्री ८० ते ८५ हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलमध्ये काही अल्पवयीन मुले असल्याची शक्यता आहे. त्या रात्री तेथे असलेल्या ४० ते ४५ तरुणांची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune Drugs Party
Daund News: मला न विचारता किराणा सामान का भरले? म्हणून पोलिसाची पत्नीला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बार आणि पब सकाळी 1.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना हा बार रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता. येथे परवानगीपेक्षा जास्त दारू विक्री केली जात होती.

आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले की, त्यांनी लिक्विड लेझर लाउंज (L3) चा परवाना निलंबित केला आहे आणि मद्य साठा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सहा वेटर्सना अटक केली आहे.

Pune Drugs Party
Pune Ring Road : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रिंगरोडच्या भूमिपूजनाचा नारळ लवकरच फुटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.