Pune News: दारुच्या नशेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास पौड फाटा इथं हा अपघात झाला. आशिष पवार हा टेम्पो चालक दारू पिऊन टेम्पो चालवत होता.
कोथरूड मधील करिश्मा चौकात त्याने काहींना धडक देऊन जखमी केले. त्यानंतर तसाच पुढे टेम्पो चालवत सिग्नलला उभ्या असलेल्या अमराळे दाम्पत्याला धडक दिली ज्यात गितांजली अमराळे यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. अपघात ठिकाणी जवळ असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.