DSK विश्‍वची पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना; महापौरांचे आश्‍वासन

डीएसके विश्‍वला किरकटवाडी आणि धायरी येथून स्वतंत्र जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो.
Water
Water sakal
Updated on

पुणे : धायरीतील डीएसके विश्‍व भागाला गेल्या महिन्याभरापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने तेथील रहिवाशांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेतील सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. (Dhayari Vishwa Water Problem)

डीएसके विश्‍व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. आनंद पाटील, किशोर पोकळे, प्रथमेश कुलकर्णी, रत्नाकर फाटक, मंदार बडवे, विनायक जोशी, संजय ठकार, विवेक नवांगुळ, संध्या बासुतकर, सतीश जाधव, आशिष जोशी, सतीश दीक्षित, पंकज लालसरे, सागर अंधारे, सचिन नाईक आदी यावेळी निवेदन दिले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यावेळी उपस्थित होते.

Water
लोणावळा : बोर घाटात तीन वाहनांचा अपघाता; दोन ठार दोन जखमी

डीएसके विश्‍वला किरकटवाडी आणि धायरी येथून स्वतंत्र जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. गेल्या महिन्यात मोटार जळाल्यानंतर आता पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे पावसकर यांनी सांगितले. पण यावर रहिवाशांनी असमाधान व्यक्त करत पाणी व्यवस्थित येत नसल्याने टँकरवर मोठा खर्च करावा लागत आहे असे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘डीएसके विश्‍वचा सर्व भाग महापालिकेत आला आहे, त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा महापालिकेची ठेवली पाहिजे. पाणी कमी का मिळत आहे याचा शोध घ्यावा, या जलवाहिनीवर अनधिकृत नळकनेक्शन आहेत का याची तपासणी करावी. तसेच एक महिना या ठिकाणच्या यंत्रणेवर देखरेख ठेवून उपाययोजना करावी असे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले. अनिरुद्ध पावसकर यांनीही त्वरित कार्यवाहीचे सुरू करू असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.