Pune : रस्त्याअभावी अतिदुर्गम घिसरच्या धनगर वस्त्यांमधील विद्यार्थी, महिलांसह वृद्धांची ससेहोलपट कायम

एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
Pune
PuneSakal
Updated on

वेल्हे - प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रायगड जिल्ह्यालगत असलेल्या वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम घिसर येथील हिरवे व कचरे धनगर वस्त्यांतील विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांची ससे होलपट होताना दिसत असून धो धो वाहणाऱ्या कानंदी नदीचे पात्र ओलांडण्यासाठी दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे.

एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल येथील नागरिक करत आहे. तुडुंब भरलेल्या गुंजवणी धरणातून ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने घिसर व परिसरातील वाड्या वस्त्यांतील धरणग्रस्तांना हालाखीला तोंड द्यावे लागत आहे.

Pune
Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अण्णा भाऊ साठेंना केले अभिवादन

प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे अनेक वर्षांपासून घिसर धनगर वस्तीचा पुल कागदावर आहे. नदीच्या पलिकडे उंच डोंगर माथ्यावर दोन्ही धनगर वस्त्या आहेत.कचरे वस्ती जवळ नदीचे पात्र ओलांडण्यासाठी बांबु लाकडाचा जिर्ण साकव आहे.

मात्र त्यावरुन ये करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर हिरवेवस्ती येथे नदीचे पात्र ओलांडण्यासाठी कोणतीही सोय नाही. त्यामुळे वेगाने वाहणाऱ्या नदीपात्रातून चिमुरड्यां विद्यार्थ्यांसह रहिवाशांना ये जा करावी लागत आहे.

अतिवृष्टीत नदीला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. गरोदर महिला, आजारी नागरिकांना बांबुच्या झोळीतुन धो धो पावसात पायपीट करून दुर अंतरावर वेल्हे येथे दवाखान्यात न्याये लागत आहे.

अंजना हिरवे, सोनाबाई हिरवे ,दगडाबाई हिरवे, रेणुका हिरवे ,सीताबाई हिरवे आदी महिलां व रहिवाशांना पुल उभारण्याची मागणी केली आहे.

Pune
PM Modi Pune Visit : आपण कधी ३ मिनीटांत विद्यापीठ रोडवरून दगडूशेठ गणपती मंदिरात पोहचू?

१) गर्भवती महिला वृद्धांसह येथील नागरिक व विद्यार्थ्यांना डोंगरदर्‍यातून प्रवास करावा लागतो प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.

स्थानिक नागरिक, लक्ष्मण हिरवे.

२) दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसह महिला वृद्ध नागरिकांचा विचार करून प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात.

विकास कडू अध्यक्ष पुणे जिल्हा सरपंच सेवा महासंघ .

Pune
Mumbai Crime : केईएम रुग्णालयातील निवासी डाॅक्टरची आत्महत्या, मृत्यूबाबत संशय

३)अनेक वर्षांपासून पुल मंजुर आहे, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात रहिवाशांना हालाखीला तोंड द्यावे लागत आहे. अतिवृष्टीत मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार आहे.

स्थानिक कार्यकर्ते, तुषार रघुनाथ कचरे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.