Pune: कात्रजमधील या शाळेची इमारत बनली मद्यपींचा अड्डा, नागरिकांचा संताप

Latest Marathi News : बाजूलाच असलेल्या हॅमी पार्क, यशश्री, यशोधन पार्क आणि आयडियल सोसायटीच्या सभासदांना याचा नाहक त्रास होतो

Katraj
Katraj
Updated on

katraj News : कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील सर्वे क्रमांक १९ आणि २०च्या तीन सोसायटींच्या अॅमिनिटी स्पेसच्या आरक्षित जागेत २०१६-१७ मध्ये ई-लर्निंग स्कूलचे काम करण्याची तरतूद करण्यात आली होती. २६ जानेवारी २०१६ला आठ वर्षापूर्वी इमारतीचे भूमिपूजन झाल्यापासून या इमारतीचे काम सुरुच आहे. आठ वर्षे उलटूनही इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

सध्या इमारतीचे काम बंद अवस्थेत असून ते कधी पूर्ण होणार याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. मात्र, शाळेची ही अर्धवट इमारत आता मद्यपींचा अड्डा बनली असून त्याचा नाहक त्रास आजूबाजूंच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर, नशेच्या आहारी जाऊन एखादा मद्यपी आत्महत्या करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


Katraj
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

दारुसह अन्य व्यसनाच्या गोष्टीचे सेवन करण्यासाठी या इमारतीचा वापर करण्यात येत आहे. याकडे महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रात्री अपरात्री या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बसून मद्यपींकडून गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजूलाच असलेल्या हॅमी पार्क, यशश्री, यशोधन पार्क आणि आयडियल सोसायटीच्या सभासदांना याचा नाहक त्रास होत असून महिला आणि लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इमारतीच्या कामासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु, २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आम्ही मागील बाजूस काम करणार होतो. परंतु, आता पुढील गेट आणि दरवाजांचे काम आधी करण्यात येईल. जेणेकरुन कोणालाही दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जाता येणार नाही. -बापू बारवकर, कनिष्ठ अभियंता, भवन विभाग, महापालिका


Katraj
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

अशा प्रकारच्या घटना होत असतील तर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क करावा, दोषी पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावणार नाहीत, ही काळजी पोलिसांकडून घेण्यात येईल.

-दशरथ पाटील, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

मी बाजूच्या सोसायटीचा रहिवाशी आहे. शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अशा प्रकारचे कृत्य सुरु असते. मद्यपी रात्री अपरात्री आवाज करत असतात. यामुळे खूप त्रास होतो. महिला आणि मुलांमध्ये त्यामुळे तणाव आणि भितीचे वातावरण आहे.

रोहित चिल्का, स्थानिक नागरिक


Katraj
Pune Road Condition: आठ कोटी रुपये खर्चून तयार केला रस्ता, मात्र ३ वर्षातच वाजले बारा, मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे पाण्यात ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()