Pune Education : समूह विद्यापीठासाठी हवेत २००० विद्यार्थी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने आराखडा जाहीर; डीपीआरची गरज

समूह विद्यापीठासाठी संबंधित संस्थांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा लागणार आहे.
Students
Students sakal
Updated on

Pune Education - नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षीत असलेल्या समूह विद्यापीठांच्या (क्लस्टर युनिव्हर्सिटी) स्थापनेसाठी आवश्यक आराखडा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये समूह विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या दोन हजार, तर समूहातील सर्व महाविद्यालये २५ किलोमीटरच्या आत असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

राज्यात शैक्षणिक संस्थांना विविध महाविद्यालयांच्या एकात्रीकरणातून समूह विद्यापीठांची स्थापना करता येणार आहे. त्या संदर्भातील नियमावली प्रसिद्ध केली असून, येत्या ३० जून पर्यंत त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येईल. मात्र, दोन महाविद्यालयांतील अंतरामुळे अनेक शैक्षणिक संस्थांना समूह विद्यापीठे स्थापना करताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

डीपीआर सादर करावा लागणार :

समूह विद्यापीठासाठी संबंधित संस्थांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये पाच वर्षांचा संस्थेचा विकास आराखडा, पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीचा अभ्यासक्रम,एनईपीनुसार केले जाणार बदल, अभ्यासक्रमांतील नाविन्यता, विस्ताराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, पुढील पाच वर्षांचे आर्थिक नियोजन आदी मुद्दे आवश्यक आहेत.

Students
Pune News: येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात गँगवार; कैद्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

अशी असेल समूह विद्यापीठाची प्रक्रिया :

समूह विद्यापीठाची नियमावली अंतिम झाल्यानंतर संस्थांकडून प्रस्ताव मागविले जातील. त्यानुसार संबंधित संस्थांनी डीपीआर सादर करणे आवश्यक आहे. सरकारकडे आलेल्या प्रस्तावांची छाननी एका विशेष समितीमार्फत केली जाईल. ही समिती संस्थेला, सहभागी महाविद्यालयांना सुद्धा भेट देईल.

प्रस्तावात त्रुटी आढळून आल्यास त्याची पुर्तता करावी लागेल. त्यानंतर समितीकडून सरकारला मान्यतेबाबतच प्रस्ताव सादर केला जाईल. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ३ (६) अंतर्गत मंत्रिमंडळ व राज्यपालांची या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच क्लस्टर विद्यापीठाची निर्मिती होऊ शकते.

Students
Mumbai : कल्याण पूर्व, डोंबिवलीतील नेते केवळ स्टेजवर मिरविणारे,शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख रवी पाटील आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले

समूह विद्यापीठांची प्रस्तावित नियमावली :

- किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाखाली सुरू असावीत.

- एखाद्या संस्थेमध्ये पाचपेक्षा जास्त महाविद्यालये असल्यास संस्थानिहाय अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल

- नेतृत्व करणारे महाविद्यालय हे २० वर्षांपासून अस्तित्वात हवे

- समूह विद्यापीठातील विद्यार्थी संख्या कमीत कमी चार हजार असावी

- मुंबई महानगरासाठी दोन हेक्टर तर नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक आदी महानगरांसाठी ४ हेक्टर आणि इतर शहरांसाठी ६ हेक्टर जागा असावी.

Students
Mumbai : कल्याण पूर्व, डोंबिवलीतील नेते केवळ स्टेजवर मिरविणारे,शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख रवी पाटील आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले

- नॅक स्कोअर ः नेतृत्व करणाऱ्या महाविद्यालयाचे नॅक रेटिंग ३.२५ हवे. तसेच ६० टक्के एनबीए ॲक्रिडिटेशन असावे.

- किमान दोन संशोधन केंद्र हवीत .

- डिजिटल पायाभूत सुविधांसह , उद्योगांशी भागीदारी आवश्यक

- आयटी सेंटर,स्टार्ट अप सेंटर, इनक्युबेशन सेंटर बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.