Pune Education : 'या' खासगी विद्यापीठांना क्यूएस आय गेज रेटिंग पुरस्काराने केले सन्मानित

डॉ.चिटणीस म्हणाले,‘‘आमच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सातत्यांनी प्रयत्न करत आहोत.
Pune Education
Pune EducationSakal
Updated on

Pune Education - एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी या खासगी विद्यापीठांना क्यूएस आय गेज रेटिंग पुरस्काराने सन्मानित करून डायमंड श्रेणी देण्यात आली.

क्यूएस आय गेज संस्थेतर्फे दुसऱ्या शैक्षणिक गुणवत्ता परिषदेच्या समारोप प्रसंगी क्यू आय गेज चे प्रादेशिक संचालक व सीईओ डॉ. अश्विन फर्नांडिस व रविन नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आणि मूल्यवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय क्यूएस आय गेज या स्वतंत्र रेटिंग प्रणालीद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Pune Education
Mumbai Metro : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेर भराव टाकण्याचे काम सुरू; बंद मार्ग लवकर सुरु करण्याचा प्रयत्न

एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे हा पुरस्कार कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस सहित आयओसीचे संचालक प्रा.शंकर माळी, डॉ.नितिन जोशी, प्रा.दिक्षा बेडेकर आणि अर्चना पवार यांनी स्विकारला.

डॉ.चिटणीस म्हणाले,‘‘आमच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सातत्यांनी प्रयत्न करत आहोत. आता आम्ही क्यूएस आय गेजच्या पुढील आवृत्तीत प्लॅटिनम श्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करू.

Pune Education
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

’’ परिषदेत एकूण १० भारतीय विद्यापीठांना रेटिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एमआयटी सहित सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीला डायमंड श्रेणी मिळाली.

त्याचप्रमाणे रेवा बेंगळुरू येथील रेवा विद्यापीठ, गुडगांवची नॉर्थकॅप युनिव्हर्सिटी, बेंगळुरूची अलायन्स युनिव्हर्सिटी, चिकबल्लापूरची एसजेसी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगळुरू येथील श्री व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि म्हैसूर येथीलविद्यावर्धका कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Pune Education
Mumbai Crime : पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहीम; 318 आरोपीवर कारवाई, लाखोंचा माल जप्त

परिषदेच्या सुरवातीला माईर्स एमआयटी समूहाच्या विश्वस्त महासचिव प्रा.स्वाती कराड चाटे, सिम्बायोसिच्या प्र कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. दिशा कामदार यांनी महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडले. सेजल जोधावत आणि राघव शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.