Pune By election : पुण्याच्या निवडणुकीत अमित शहांना का उतरावं लागतंय ?

अमित शाह हे येत्या १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. माहितीनुसार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी अमित शाह पुण्यात येणार आहे.
Pune election Amit Shah
Pune election Amit Shahsakal
Updated on

Pune - राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप आमदारांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. यासाठी सगळ्याच पक्षांनी जय्यत तयारी सुरु आहे. आता तसं पाहिलं तर बऱ्याचदा एखाद्या नेत्याच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणुक ही बिनविरोध होत असते,

पण निवडणूक लागलीच समजा तर नेहमीच्या निवडणुकांसारखा भलामोठा तामझाम नसतो. म्हणजे पक्षातील स्थानिक लेव्हलची तयारी, फार फार तर बड्या नेत्यांच्या सभा होतात.पण कसबा आणि चिंचवडची जागा कायम राखता यावी यासाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येणार असल्याचं समजतंय.

आता पुण्यातल्या आपल्याच मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी थेट राष्ट्रीय लेव्हलच्या अमित शाहांना का उतरावं लागतंय?

तर अमित शाह हे येत्या १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. माहितीनुसार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी अमित शाह पुण्यात येणार आहे. आता थेट राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला पुण्यातीळ निवडणुकीच्या प्रचारासाठी यावं लागतंय म्हंटल्यावर त्यामागची कारण देखील तितकीच महत्वाची असणार आहेत....

तर कसबा पोटनिवडणुकीच चित्र पाहिलं तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणुक लागली आहे. आता सहसा होत असं कि, दिवंगत आमदारांच्या निधनानंतर त्या भागात लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांचे पती शैलेश टिळक आणि सोबतच मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा होती.

मात्र भाजपने या दोघांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अर्थात टिळक कुटुंबीय नाराज झाले आणि त्यांची नाराजी माध्यमातून दिसून आली. पण टिळक कुटुंबीयच नाही तर कसबा मतदारसंघातले मतदार सुद्धा भाजपच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचं चित्र निर्माण झालं ते कसबा परिसरात झालेल्या फ्लेक्सवरून.. ज्यावर ब्राम्हण उमेदवारांना डावल्याचा आरोप करण्यात आला.

आता हे आरोप नेमके कोणी लावले याचा खुलासा तर काही झालं नाही. पण यामुळे ब्राम्हण मतदार आणि टिळक समर्थक नाराज असल्याचं चित्र तयार झालं. त्यामुळे आपला पारंपरिक मतदार टिकून राहावा यासाठी थेट पक्षाच्या बड्या नेत्याकडून प्रचार करून घेणं पक्षासाठी जास्त फायद्याचं ठरेल.

यातीलच दुसरं कारण म्हणजे तगडी लढत...

कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यासमोर महाहविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा आहे. परिसरात जनसेवेचे माध्यमातून त्यांनी आपली ओळख तयार केली आहे. आणि धंगेकर यांच्यासोबतच हिंदू महासभेचे आनंद दवे, आप आदमी पक्षाचे किरण कद्रे हे देखील याठिकाणी निवडणुकीसाठी रिंगणात आहेत.

तर दुसरीकडे चिंचवड मतदारसंघाच चित्र पाहिलं तर...

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत पक्षाने त्यांच्याच पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. आता चिंचवड हा जगतापांचा गट असला तर त्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि अश्विन जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पण त्यातही नाना काटे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीशी बंडखोरी करून राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि हे तेच कळते आहेत ज्यांनी २०१९ मध्ये लक्ष्मण जगताप यांना तगडी लढत दिली होती. कलाटे यांना १ लाख १२ हजारांवर मतं मिळाली होती.आणि कलाटे यांनी ती निवडणूक देखील अपक्ष म्हणूनच लढवली होती.

त्यामुळे चिंचवडमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आणि या तिहेरी लढतीत जगताप यांच्या पत्नीच्या बाजूने कौल लागावा यासाठीच अमित शाह चिंचवडमध्येही सभा घेणार असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.