Pune Cyber Crime : एक क्लिक अन् पुण्यातल्या इंजिनियरने गमावले ५७ लाख रुपये; सायबर क्राईमची नवी पद्धत

पीडित व्यक्तीने भारतातील अनेक बँक खात्यांमध्ये एकूण ५७,१५,००० रुपयांचे ऑनलाइन व्यवहार केले
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

पुण्यातील एका अभियंत्याला ‘मुव्ही रेटिंग’ व्यवसायात गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन सायबर गुन्हेगारांनी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितलं. तक्रारदाराला सुरुवातीला उच्च परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि नंतर त्यांना पैसे देण्यास भाग पाडलं गेलं, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कंपनीसाठी काम करणाऱ्या ४० वर्षीय इंजिनियरने सांगितलं की, त्याने भारतातील अनेक बँक खात्यांमध्ये एकूण ५७,१५,००० रुपयांचे १५ ऑनलाइन व्यवहार केले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील रावेत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

Cyber Crime
Nashik Crime News : भुवन शासकीय आश्रमशाळा अधीक्षक-अधीक्षिकांचे निलंबन; गैरवर्तन भोवले

फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी एका महिलेने फोन मेसेंजर अॅप्लिकेशनवर त्याच्याशी संपर्क साधला. तिने "स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट तिकीट प्रमोशन रेटिंग एजन्सी" ची अधिकारी असल्याचा दावा केला. तक्रारदाराने व्यवसायात पैसे गुंतवल्यानंतर, प्रत्येक वेळी चित्रपटाला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाल्यावर त्याच्या विक्रीवर कमिशन मिळेल, असा दावा तिने केला . तो यासाठी तयार झाला तेव्हा त्याचं खातं उघडण्यात आलं.

Cyber Crime
Cyber Crime : युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं अन् खटक्यात उडले ८ लाख रुपये; तुमच्यासोबतही 'हे' होऊ शकतं

पुढील दोन आठवड्यांत, त्याला आणखी मोठी रक्कम भरायला सांगितली आणि त्याने सुरुवातीला चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने पेमेंट केलं. त्यानंतर, जास्त कमिशन मिळविण्यासाठी आणि सुरुवातीची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी कॉलरने त्याला पैसे देण्यास भाग पाडायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येण्यापूर्वी त्याने गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील खात्यांवर १५ व्यवहार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर १७ मार्च रोजी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राईम सेलशी संपर्क साधला. प्राथमिक चौकशीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला रावेत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()