Pune: दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचा कार्यकारी अभियंता ताब्यात

Pune Crime News: दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता अटकेत; भ्रष्टाचाराचा पर्दाफाश
Pune: दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचा कार्यकारी अभियंता ताब्यात
Updated on

Latest Pune News: नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक डीपी उभारुन विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या घटनेमुळे महावितरणमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१, कार्यकारी अभियंता, महावितरण, बंडगार्डन विभाग, पुणे वर्ग-१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune: दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचा कार्यकारी अभियंता ताब्यात
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.