Pune Tulshibaug : तुळशीबागेतील गर्दीत सुविधाच हरवल्या!

‘माझी आई खरेदीसाठी तुळशीबागेत जात होती. तीन-चार तास सहज तिची खरेदी चाले. आता तुळशीबाग बदलली. तेथे अतिक्रमणे वाढली.
Tulshibaug Pune
Tulshibaug PuneSakal
Updated on
Summary

‘माझी आई खरेदीसाठी तुळशीबागेत जात होती. तीन-चार तास सहज तिची खरेदी चाले. आता तुळशीबाग बदलली. तेथे अतिक्रमणे वाढली.

पुणे - ‘माझी आई खरेदीसाठी तुळशीबागेत जात होती. तीन-चार तास सहज तिची खरेदी चाले. आता तुळशीबाग बदलली. तेथे अतिक्रमणे वाढली. त्यातून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पण, स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न समोर आला. त्यामुळे आईच्या तुलनेत माझे तुळशीबागेतील खरेदीचे तास मात्र निश्चित कमी झाले,’’ अशी भावना राधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

आजच्या ऑनलाइन शॉपिंगच्या काळातही महिलांची पावले खरेदीसाठी वळतात ती तुळशीबागेकडेच! तुळशीबाग हा कसबा विधानसभेचा भाग. याच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यातून तुळशीबागेतील महिलांचा खरेदीचा वेळ आता कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘पूर्वी स्वच्छता, आरोग्य याला इतके महत्त्व नव्हते. पण, कोरोनानंतर त्याला सर्वाधिक महत्त्व आले आहे. जे घ्यायचे तेच बघायचे या दृष्टिकोनातून खरेदीचे नियोजन मी करते.’

रूपाली काळंगे म्हणाल्या, ‘सण, उत्सव, लग्न समारंभाच्या खरेदीसाठी आमची येथे भेट कायमच असते. मोठ्या खरेदीसह छोट्या-छोट्या गोष्टींची खरेदी करताना दमछाक होते. अशा वेळेस ठिकठिकाणी बाके उपलब्ध असावीत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांचीच सोय होईल. गर्दीमध्ये सुरक्षेसाठी महिला पोलिस असाव्यात.’

शहरातून तसेच विविध ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ व्यवस्था उपलब्ध होत नाही. त्यासाठी पेठांतील आसपासच्या परिसरात वाहने लावून तेथून तुळशीबागेपर्यंत ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची संकल्पना तुळशीबाग व्यापारी असोसिएशनची आहे. ती सत्यात उतरण्यासाठी महापालिका प्रशासनासह कसब्याच्या भावी आमदारांनी लक्ष घातल्यास वाहनतळाचा प्रश्‍न मार्गी लागेल.

याची आवश्यकता...

  • माहितीपर फलक बसवावेत

  • सार्वजनिक शौचालयांची सुविधा वाढवावी

  • ज्येष्ठ, स्तन्यदा माता यांना थांबण्यासाठी सुरक्षित ठिकाण

  • महिला पोलिसांची संख्या वाढवावी

  • पिण्याच्या पाण्याचे कूलर उपलब्ध करून द्यावेत

  • बसण्यासाठी बाकांची गरज, वाहनतळाची व्यवस्था

सद्य:स्थिती...

  • ४०० - एकूण दुकाने

  • ६ - महिला दुकानदार

  • ३५० - पथारी व्यावसायिक

  • ५ - महिला पथारी व्यावसायिक

  • सुमारे २५० - कर्मचारी महिला

  • सुमारे १०,००० - प्रतिदिन येणारे ग्राहक

विकासकामांचे नियोजन तुळशीबागेत केले आहे. परंतु कोरोनामुळे कामे होऊ शकली नाहीत. त्यातच महापालिकेचा कारभार आता आयुक्तांकडे आहे. आत्तापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींची मदत मिळाली आहे. निवडून येणाऱ्या आमदारांकडूनही त्वरित मदत मिळून येथील विकासकामे लवकर पार पडावी अशी अपेक्षा आहे.

- नितीन पंडित, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन

मी येथील दुकानात काम करते आहे. येथे कामास येणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे शौचालयाचा अधिक वापर असतो. आणखीन शौचालये वाढवावी आणि ती विना शुल्क उपलब्ध करून द्यावी.

- जुलेखा खान, नोकरदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()