पुणे : २०२१-२२ उसाला गाळप हंगामासाठी एफआरपीप्रमाणे २९५० रुपये भाव द्यावा, या मागणीला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरीचे परिपत्रक साखर आयुक्तांनी दिले. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याची सरकारने दखल घेतली, असे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी सांगितले.
याप्रसंगी हिरामण बांदल, अनिल भांडवलकर, रवी राणा पवार, महेश गिरी डॉक्टर राजू चौधरी, डॉक्टर प्रकाश पाटील, अर्जुन कोराळे, जयश्री चव्हाण, गुलाबराव पाटील, नंदकुमार लोखंडे, सतीश लोखंडे, शंकरराव लोखंडे, दीपक फाळके, हर्षदा लोखंडे, प्रज्वल कोठरे शेतकरी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राज्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर साखर आयुक्तांनी दोन हजार ९०० रुपये प्रतिटन भाव देण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. संघटनेच्या आंदोलनाचा विजय आहे. येत्या पंधरा दिवसांत पहिला हप्ता जमा झाला नाही, तर शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.