Pune Drugs Case : एलथ्री बारमध्ये झाला अंमलीपदार्थाचा वापर! पोलिसांकडून तिघांना अटक; नायजेरीयन नागरिकाचाही समावेश

Pune Drugs Case Latest News : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लेझर लाऊंज (एलथ्री) या बारमध्ये झालेल्या पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा झाल्याचे अखेर उघड झाले.
Pune FC Road bar Drugs Case
Pune FC Road bar Drugs Case
Updated on

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लेझर लाऊंज (एलथ्री) या बारमध्ये झालेल्या पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा झाल्याचे अखेर उघड झाले. दरम्यान, पार्टीसाठी मेफेड्रोन पुरविणाऱ्या तिघांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका नायजेरीयन नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना मेफेड्रोन, कोकेन यांसारखे अमली पदार्थ आढळले आहेत. न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अभिषेक अमोल सोनवणे (वय २३, रा. डिझेल कॉलनी, रेल्वे क्वार्टर, पुणे स्टेशन), ओंकार अशोक सकट (वय २८, रा. महात्मा फुले पेठ), इडोको स्टॅव्हली संडे (रा. नायजेरिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह (एनडीपीएस), महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

एलथ्री बारमध्ये पहाटे पाचपर्यंत सुरू असलेली पार्टी व त्यामध्ये अमली पदार्थांचा झालेला वापर, याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाला होता. त्यानंतर पोलिस, महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. दरम्यान, संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारे नितीन नथुराम ठोंबरे व करण राजेंद्र मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांना अमली पदार्थ देणारा व्यक्तीचे नाव पुढे आले होते. त्यावरून पोलिसांनी शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरातून अभिषेकला अटक केली.

Pune FC Road bar Drugs Case
Maharashtra Interim Budget 2024: विद्यार्थ्यांसाठी धावून आले अजित पवार! अर्थसंकल्पात केल्या 'या' योजना जाहीर

त्याच्याकडून एक ग्रॅम सोने जप्त केले. त्याची चौकशी केल्यानंतर ओंकार व इडोकोने त्यास अमली पदार्थ दिल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी ओंकार व इडोकोला अटक केली. पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत ओंकारकडे सहा-सात ग्रॅम मेफेड्रोन पावडर, इडोकोकडे 2.8 ग्रॅम कोकेन सापडले. अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत आणि सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी न्यायालयात दिली. बचाव पक्षातर्फे ॲड. अमोल नराल यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी हा आदेश दिला.

Pune FC Road bar Drugs Case
Maharashtra Budget 2024: ऊसतोड कामगारांच्या मुलामुंलीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ८२ शासकीय वसतीगृह स्थापन करण्यास दिली मंजूरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.