Pune Drugs Case : फर्ग्युसन रोडवरील 'एल थ्री'मधील पार्टीसाठी कुठून झाला ड्रग्जचा पुरवठा? धक्कादायक माहिती आली समोर

Pune Drugs Case Latest News : यापूर्वी पोलिसांनी हे अमली पदार्थ पार्टीत सहभागी झालेल्या तरुणाने मुंबईतून आणल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
Pune FC Road bar Drugs Case
Pune FC Road bar Drugs Case
Updated on

पुणे, ता. २६ ः नामदार गोपाळकृष्ण गोखले पथावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असलेल्या लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या पार्टीतील तरुणांना अमली पदर्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही बाब समोर आली आहे. यापूर्वी पोलिसांनी हे अमली पदार्थ पार्टीत सहभागी झालेल्या तरुणाने मुंबईतून आणल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यातील एक तरुण मुंबईचा असून त्याने पार्टीसाठी मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई) आणि करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ठोंबरे हा वास्तुविशारद म्हणून काम करतो. तर मिश्रा हा एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता आहे. ठोंबरे आणि मिश्रा हे दोघे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली आहे.

Pune FC Road bar Drugs Case
Rahul Gandhi T Shirt: विरोधी पक्षनेते होताच राहुल गांधी पांढऱ्या टी-शर्टवरून कुर्त्यावर का? अखेर कारण समोर

या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार (एनडीपीएस) कलमवाढ करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात १० जणांना अटक केली आहे. तर पार्टीत सहभागी झालेल्या नऊ जणांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली गेली आहे. तसेच, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. कल्याणीनगर अपघातानंतर शहरातील पबवर कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने राबवले आहे. वेळेतच पब बंद केले जात आहेत. परंतु, त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीत अमली पदार्थाचा वापर झाल्याची बाब समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Pune FC Road bar Drugs Case
Rahul Gandhi Ashadhi Wari: राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार? वाचा काँग्रेसची काय आहे स्ट्रॅटेजी

पार्टीच्या आयोजनात व्हॉट्सअप ग्रुप व इंस्टाग्रामचा वापर

कल्ट येथून एल-थ्री रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी आलेल्या लोकांनी पुणे वाईब्स नावाने व्हाटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून पार्टीची माहिती एकमेकांना देण्यात आल्याचे पुढे आले आहे. बारमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात व्हॉट्सअप ग्रुप तसेच इंस्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी ग्रुप काढला जातो. त्यातून पार्टी आयोजित केली असल्याची माहिती दिली जाते. त्यामुळे पोलिसांकडून यावर नजर ठेवली जात असल्याची माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.