फायनान्स कंपन्यांच्या मुजोरपणाला आवरा

गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्यांना फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे.
finance company
finance companysakal
Updated on
Summary

गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्यांना फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे.

पुणे - ‘क्रेडिट कार्डचे (Credit Card) पैसे वापरताना लाज वाटली नाही का? पोलिसांना (Police) आम्ही सीएसआर फंड देतो, आमचे कोणीही काही करू शकत नाही, अशा अर्वाच्य भाषेत कर्ज घेणाऱ्यांना फायनान्स कंपन्यांचे वसुली (Finance Company Recovery) एजंट धमकावतात. एवढेच नव्हे, तर मी एका फायनान्स कंपनीकडून घेतलेली रिक्षा व वैयक्तिक कर्जाचे हफ्ते वेळेवर भरतो, तरीही वसुली एजन्सीकडून रात्री-अपरात्री फोन येतात. मला व माझ्या कुटुंबीयांना शिव्या, धमक्‍या (Bullying) देतात. रिक्षा अडवून पैशांची मागणी करतात. या प्रकाराला कंटाळलो असून आत्महत्येचा विचार मनात येत आहे,’ अशा प्रकारच्या असंख्य प्रतिक्रिया नागरिकांकडून येऊ लागल्या आहेत. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीच्या लोकांकडून होणाऱ्या या छळामुळे हजारो नागरिक त्रस्त झाले असून, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिक पोलिसांकडे करत आहेत.

गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्यांना फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे. याबाबतची वृत्तमालिका ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्यात नागरिकांनी त्यांना आलेले अनुभव व समस्या ‘सकाळ’ला पाठवून त्यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे. त्याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार घेत नाहीत. बॅंका, फायनान्स कंपन्या उभ्या करीत नाहीत. संबंधित कंपन्या ‘आरबीआय’चे नियमच धाब्यावर बसवीत असल्याने ‘आरबीआय’ला कळवूनही काही उपयोग होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे आता करायचे तरी काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. फायनान्स कंपन्यांच्या मुजोरपणाविरुद्ध रिक्षा संघटनांकडे शेकडो तक्रारदार दररोज तक्रारी करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही संबंधित एजन्सीकडून वेठीस धरण्याचे प्रकार घडत असूनही त्याविरुद्ध कोणीच दखल घेत नसल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

finance company
राहुल देशपांडे यांच्या गायनाने १५ व्या वसंतोत्सवाचा समारोप

नागरिक म्हणतात...

कर्जदार व्यक्ती - कर्ज थकले म्हणून आम्हाला वसुली एजन्सीवाले घर लिलाव करा किंवा देऊन टाका असे बजावतात. सहा महिन्यांपासून त्रास सुरू आहे. आत्महत्या करा किंवा मरा, आम्ही हफ्ता सोडणार नाही. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देतात. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतात. शेजाऱ्यांसमोर आमची बदनामी करतात.

तरुण कर्जदार - दुचाकी कर्जावर घेतली होती. कोरोनामुळे काम गेल्याने गाडीचे पाच हफ्ते थकले. त्यानंतर मी पैसे भरण्यास तयारही झालो. परंतु, त्यांनी मला सर्व पैसे भरण्यास सांगितले. तसेच, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

रिक्षाचालक (हडपसर) - वाहन खरेदी करण्यासाठी मी एका फायनान्स कंपनीकडून वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्याचे चार हफ्ते थकले. तेव्हापासून कोणतीही नोटीस न देता त्यांनी दमदाटी करून माझी रिक्षा घेऊन गेले.

नोकरदार (सांगवी) - माझ्याकडे एका बॅंकेचे क्रेडिट कार्ड आहे. मी व माझे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मी त्यामधून दोन लाख रुपये खर्च केले.

नोकरदार (ताथवडे) - माझ्या नातेवाइकाने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज त्यांनी फेडले. दरम्यान, त्या नातेवाइकांशी आमचा संबंध राहिला नाही. आता संबंधित फायनान्स कंपनीच्या वसुली एजन्सीकडून माझ्या वृद्ध आईला फोन येत आहेत. तिला अतिशय वाईट भाषेत शिवीगाळ करीत आहेत. या प्रकारामुळे आईला मानसिक धक्का बसला असून, दररोज धमकीचे फोन येतात. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

तुम्हीही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलंय आणि असेच अनुभव तुम्हालाही आले असतील, तर आमच्याकडे व्यक्त व्हा. ‘सकाळ’चा व्हॉटस्‌ॲप क्रमांक - 8484973602

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.