Palasdev News - (ता. इंदापूर) येथील काळेवाडीजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर गुरुवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टिश्यू पेपर बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक व त्यातील माल पूर्णपणे खाक झाला.
पुण्याच्या दिशेने चाललेल्या या ट्रकला (क्र. के.ए. ५६, ३८३१) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यावर चालकाने ट्रक जागेवर उभा केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पासगे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली.
पेटलेला ट्रक महामार्गावर उभा असल्याने त्यांनी लगतच्या सेवा रस्त्याने वाहतूक वळविली. भादलवाडी येथील बिल्ट कंपनी व इंदापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग शमवली. हा ट्रक बाजूला घेण्यासाठी हायड्रो क्रेनची आवश्यकता होती. परंतु, ती उपलब्ध नसल्याने ट्रक सकाळपर्यंत रस्त्यावर उभा होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.