Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Gas tanker explosion at Pune : पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे.
Gas tanker explosion at Pune
Gas tanker explosion at Pune Esakal
Updated on

पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची मोठी पडझड झाली आहे. मोहितेवाडी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या भीषण स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. या भीषण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. परिसरातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टँकरचा स्फोट झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांना आग लागली होती.

Gas tanker explosion at Pune
Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. लागलेली आग नियंत्रणात आणली. टँकरमधून गॅस गळती झाल्याने आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.

Gas tanker explosion at Pune
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला 'येलो अलर्ट...'! पुढील ३ दिवसात 'या' १९ जिल्ह्यांना बसणार वादळी वाऱ्याचा तडाखा

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी परिसरात ढाबा(हॉटेल) आहे. या ढाब्यावर नेहमीच गर्दी असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता. अचानक या टँकरला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केलं. गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे जवळपास एक किलोमीटरपर्यंत बसले. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले.

गॅसच्या स्फोटाने महामार्गालगत असलेल्या अनेक घरांच्या काचा फुटल्या. तसेच काही घरांची पडझड देखील झाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

Gas tanker explosion at Pune
Monsoon Update : मॉन्सूनची राज्यात सहा जूनला हजेरी; तळकोकणात दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.