cm eknath shinde
cm eknath shindeesakal

Pune Flood Alert : लष्कराला पाचारण करा! पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुण्यात सध्या सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं तलावासारखं स्वरुप आलं आहे.
Published on

पुण्यात सध्या सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं तलावासारखं स्वरुप आलं आहे. अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या लोकांना सुरक्षितस्थळी हालवण्यासाठी आणि पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्कराला पाचारण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

cm eknath shinde
Monsoon Safety Tips : पावसाळ्यात तुमच्या सुरक्षेची अशी घ्या काळजी, ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, "सकाळपासून त्यांना अलर्ट केलं आहे. फिल्डवर उतरुन त्यांना मदत करण्याच्या आम्ही सुचना केलेल्या आहेत. पुण्यामध्ये खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं शहर परिसरात जास्त पाणी सर्व परिसरात साचलेलं आहे. त्यामुळं सर्वात आधी मी तिथल्या पुणे, पिंपरी-चिंचवडचे जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, एसडीआरएफ-एनडीआरएफ यांना सूचना केलेल्या आहेत. त्याच बरोबर स्थानिक प्रशासनाच्या फायर ब्रिगेडलाही सूचना दिलेल्या आहेत"

cm eknath shinde
ऑर्थररोड जेलचा भत्ता खावून आलोय, आता कोणी मायचा लाल...; अनिल देशमुखांचं भाजपला आव्हान

"तसंच मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पुण्याचे मेजर जनरल अनुराग विज यांना मी सूचना केल्या आहेत. ते सध्या स्पॉटवर आहेत. तसंच कर्नल संदीप यांनाही फोन केला होता. त्यांनाही सांगितलं की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या रेस्क्यू टीम आहेत त्यांना तैनात करा. आर्मी देखील कामासाठी स्पॉटवर जात आहेत. लोक अडकले असतील तर त्यांना एअर लिफ्ट करण्याची गरज पडल्यास ते ही करण्याच्या सूचना दिल्या आहेत"

cm eknath shinde
Pune Rain: अतिमुसळधार पावसाने झोडपले! मध्यरात्री पीएमसी पुणेकरांच्या मदतीला; जारी केली आपत्कालीन हेल्पलाइन, पर्यटकांनाही इशारा

"तसंच प्रशानाला सांगितलंय की, आरोग्य, पोलीस आणि रेस्क्यू टीमला सांगितलं आहे की, या सर्वांनी सज्ज राहून पुणेकरांना मदत करा. तसंच पूरस्थितीतील लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच त्यांना पिण्याचं पाणी, फूड पॅकेटची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कार्यालये तसेच शाळांना सुट्ट्या देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. माझं संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष आहे, असंही यावेळी मुख्यंमत्र्यांनी सांगितलं. तसंच मुंबई-पुण्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अजित पवार हे कन्ट्रोल रुममध्ये बसून आहेत," अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.