पुणे : मैलापाणी शद्धिकरण प्रकल्पासाठी वन विभागाची जागा

पुणे महापालिकेच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (जायका) खराडी येथे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वन विभागाची जागा संपादन करण्यात येणार आहे.
Jica
JicaSakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (जायका) खराडी येथे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वन विभागाची जागा संपादन करण्यात येणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (जायका) (JICA) खराडी येथे मैलापाणी शुद्धीकरण (Drainage Water Purification) केंद्र उभारण्यासाठी वन विभागाची (Forest Department) जागा संपादन (Land Acquisition) करण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाकडून १.२५ हेक्टर जागा महापालिकेला मिळणार असून, त्याची भरपाई म्हणून महापालिकेची तुळापूर येथील १.२५ हेक्टर जमीन वन विभागाला देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

जायका प्रकल्पाअंतर्गत ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. खराडी येथील ३.६६ हेक्टर क्षेत्रावर एका केंद्रासाठी विकास आराखड्यात आरक्षण आहे. त्यापैकी १.२५ हेक्टर जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. महापालिका आवश्यक असणाऱ्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा वन विभागास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

Jica
PMP कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

महापालिकेने जायका प्रकल्पासाठी काढलेली निविदा अंतिम टप्‍प्यात असून, त्यासाठी एक कंपनी पात्र ठरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या निविदेस स्थायी समितीची मान्यता मिळून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाची ही जागा ताब्यात येणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.

पाण्याच्या टाकीसाठी वन विभागाची जागा

चतु:शृंगी पाणीपुरवठा अंतर्गत भांबुर्डा वनविहारात बांधण्यात येणाऱ्या टाकीसाठी ०.४३२ हेक्टर वन जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाला ११ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. ही टाकी उभारल्यामुळे गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, चतु:शृंगी मंदिर परिसर, सेनापती बापट रस्ता परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.