Pune: 18 दिवसांत चार बिबटे जेरबंद, नागरिकांना सावधानतेचा इशारा!

Latest Marathi News: एकाच वस्तीवर अवघ्या १८ दिवसात सलग चौथा बिबट्या जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे
Pune: 18 दिवसांत चार बिबटे जेरबंद, नागरिकांना सावधानतेचा इशारा!
Updated on

Ambegaon News: बिघेवस्ती -काटवानवस्तीत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार(ता.२९) पहाटे एक ते दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला आहे,बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट मादी येऊन पिंजऱ्याला धडक्या देऊन सोडवण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे परिसरातील नागरिकांना वनविभागाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

एकाच वस्तीवर अवघ्या १८ दिवसात सलग चौथा बिबट्या जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे,त्यामुळे अजुनही काटवानवस्ती,बिघे वस्तीत बिबट्यांचा वावर असून बिबट्याचे भय काही संपत नसल्याचे चित्र असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वळती येथील काटवानवस्ती,बिघेमळ्यात अवघ्या १८ दिवसात गुरुवारी पकडलेला हा चौथा बिबट्या ठरला आहे ,१२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पहिला बिबट्या जेरबंद झाला त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी दुसरा बिबट्या हा एक वर्षाचा नर जातीचा होता त्यानंतर तिसरा बिबट्या २५ ऑगस्ट रोजी जेरबंद झाला आहे.

Pune: 18 दिवसांत चार बिबटे जेरबंद, नागरिकांना सावधानतेचा इशारा!
Pune Latest News Update| पुण्यात धान्याच्या किराणा दुकानला भीषण आग, पाहा व्हिडीओ

या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी मारुती कारभारी भोर यांनी पुन्हा वनविभागाला पिंजरा पुन्हा लावण्याची मागणी केली होती,त्यानंतर गुरुवार (ता.२९) रोजी पहाटेच्या सुमारास पुन्हा चौथा बिबट मादी बछडा जेरबंद झाला,बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास मादीने डरकाळ्या फोडत पिंजऱ्याला धडक्या दिल्या यावेळी येथील शेतकरी मारुती भोर यांनी बॅटरी लाऊन पाहिले असता बिबट मादी पिंजऱ्या भोवती घिरट्या घालत होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी वनविभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांसह व वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट बछडा मादीला ताब्यात घेतले. यावेळी धोंडीभाऊ भोर,आनंद वाव्हळ,मारुती भोर यांच्यासह वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांसह,ग्रामस्थ उपस्थित होते.

Pune: 18 दिवसांत चार बिबटे जेरबंद, नागरिकांना सावधानतेचा इशारा!
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

एकाच वस्तीवर १८ दिवसात चार बिबटे जेरबंद होण्याची पहिलीच वेळ..

बिघेमळा-काटवानवस्ती परिसरात १८ दिवसात चार बिबटे जेरबंद होण्याची परिसरात पहिलच घटना आहे,अजून एक मादी पहाटे धडक्या देत असल्याचे शेतकरी मारुती भोर यांनी पाहिले आहे त्यामुळे परिसरात मादी सह अजून बिबट्याचा वावर आहे त्या संतोष पाटीलबुवा लोखंडे यांच्या दोन मेंढ्या बिबट्याने रविवारी मध्यरात्री ठार केल्या असून या परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक शेतकरी मारुती भोर यांनी सांगितले आहे त्यामुळे बिबट्याचे भय अजून संपत नसल्याचे चित्र आहे तरी वनविभागाने येथे पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चौकट: २) वन विभागाकडून सावधानतेचा इशारा.

गुरुवारी पहाटे बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकल्यानंतर मादीने पिंजऱ्याला धडक्या देत डरकाळी फोडली होती हे शेतकरी मारुती भोर यांनी पाहिले होते या घटनेमुळे परिसरात बिबट मादी आक्रमक होऊ शकते तरी परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.फोटो खली ओळ: बिघेवस्ती-काटवानवस्ती(वळती)ता.आंबेगाव:वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरूवारी पहाटे बिबट मादी बछडा जेरबंद झाला.

Pune: 18 दिवसांत चार बिबटे जेरबंद, नागरिकांना सावधानतेचा इशारा!
Pune News: नागरिकांच्या विरोधाने रखडलेले रस्ते ठरतायेत अपघाताला निमंत्रण, वाचा पुण्यात नक्की काय सुरु आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.