इंदापूर : इंदापूर शहरात हजारो मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर पारंपरिक पद्धतीने दर्गाह मशिदीचे मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिकपणे ईद उल फित्रची नमाज अदा केली. तत्पूर्वी मौलाना मुशाहिदी यांच्याहस्ते शिवाजी चौक खडकपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इदगाह व मदिना मशीद प्रांगणात मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आपणा सर्वांच्या रक्ताचा रंग लाल असून देखील काही लोक समाजात धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पासून सावध राहा. आजपर्यंत आपण आपले सण एकत्रित साजरे करून राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. तेच पुढे चालू ठेवा.
मुस्लिम बांधवांना मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी इंदापूर शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ असे एकूण ७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक भरत शहा,नगरपरिषद गटनेते कैलास कदम, माजी उपनराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षबाळासाहेब ढवळे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, वसंत मालुंजकर यांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या स्वतंत्रपणे शुभेच्छा दिल्या.
यावेळी अबुलखान पठाण, फारुक काझी,जकिर काझी, हाजी नवाज बागवान,जब्बार मोमीन, आरिफ खान जमादार, चमन बागवान, युसुफ शेख,शर्फुद्दिन मोमीन,गालिब बागवान,नगरसेवक अमर गाडे, दिलीप वाघमारे,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादा पिसे, अल्ताफ पठाण, शिवाजी जाधव,मुख्तार पठाण,वसीम बागवान, आरशाद सय्यद, मुजीब शेख, अली मोमीन,सादिक मोमीन, कदिर बेपारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.