पुणे : फुरसुंगी, उरुळीचे पाण्याचे टँकर होणार बंद

रोज लागतात १७५ टँकर
 पाण्याचे टँकर
पाण्याचे टँकर sakal
Updated on

पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावाला रोज १७५ टँकरने महापालिका पाणी पुरवत आहे. यात दरवर्षी एक कोटी रुपये खर्च होतो. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यापासून या गावात थेट घरोघरी नळाला पाणी येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या रखडलेल्या योजनेचे काम करण्यासाठी महापालिकेने तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होण्यापूर्वी राज्य शासनातर्फे या गावांसाठी ३३ एमएलडी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून त्यासाठी काम सुरू केले. ही योजना साडे नऊ कोटी रुपयांची होती, पण ही गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर योजनेच्या उर्वरित कामासाठी महापालिकेने निधी द्यावा अशी सूचना शासनाने केली. त्यामुळे हे काम रखडले होते. या गावात पाणी टंचाई असल्याने व कचरा डेपोमुळे नैसर्गिक जलस्रोत अशुद्ध झाल्याने पाणी उपलब्ध नाही.

 पाण्याचे टँकर
उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद

महापालिका दरवर्षी या दोन गावांसाठी टँकर पुरविण्यासाठी निविदा काढली जाते. यासाठी १कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे टँकरवर खर्च करण्यापेक्षा महापालिकेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी करत नगरसेवकांनी मुख्यसभेत आंदोलन देखील केले होते. त्यानंतर प्रशासनाने पाऊल उचलले आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘या दोन गावांसाठी ३३एमएलडी पाणी पुरवठ्याचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास ३ कोटी रुपये दिल्याने तेथे काम करून फेब्रुवारी पर्यंत २० एमएलडी पाणी पुरवठा सुरू करू शकतो असे प्राधिकरणाने सांगितले आहे. स्थायी समिती व मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा निधी दिला जाईल. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर टँकर जवळपास बंद होतील.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, २०१७ पासून तुकाई टेकडी फुरसुंगी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी लष्कर जलकेंद्रापासूनची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण नलिका, तेरा साठवण टाक्या आदी विकासकामे अपूर्ण राहिलेली आहेत. त्यासाठी स्थायी समितीने तीन कोटीचा निधी मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.