Ganapati Utsav 2024: ढोल पथकामध्ये ३० पेक्षा जास्त वादक नसावेत? सुप्रीम कोर्ट म्हणालं, त्यांना वाजवू द्या, पुण्याच्या हृदयात...

Spureme Court: पुण्यातील गणेशमूर्ती विसर्जनावेळी ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्यांची संख्या ३० जणांपर्यंत मर्यादित असावी, असा आदेश हरित लवादने दिला होता. कोर्टाने राज्य सरकार, पुणे प्राधिकरण आणि इतरांना नोटीस बजावली होती. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या.. कारण ढोल-ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल-ताशांचं समर्थन केलं.
Ganapati Utsav 2024: ढोल पथकामध्ये ३० पेक्षा जास्त वादक नसावेत? सुप्रीम कोर्ट म्हणालं, त्यांना वाजवू द्या, पुण्याच्या हृदयात...
Updated on

Pune Ganapati 2024: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसंबंधी मोठी बातमी आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावेत, असा आदेश हरित लवादाने (NGT) दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.

हरित लवादाने 30 ऑगस्ट रोजी वादकांच्या संख्येसंदर्भात आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी याबाबत स्थगिती आदेश दिले. वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

पुण्यातील गणेशमूर्ती विसर्जनावेळी ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्यांची संख्या ३० जणांपर्यंत मर्यादित असावी, असा आदेश हरित लवादने दिला होता. कोर्टाने राज्य सरकार, पुणे प्राधिकरण आणि इतरांना नोटीस बजावली होती. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या.. कारण ढोल-ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल-ताशांचं समर्थन केलं.

गणेश उत्सव सुरू असताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये अनेक मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या पथकांचा समावेश असतो, हेच मुख्य आकर्षण असतं. त्यामुळे हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.