Pune Ganpati Visarjan: पुण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, पोलीस थेट डीजेवर चढले! नेमकं काय घडलं?

Police Clash with Ganesh Mandal Workers During Visarjan Procession in Pune: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा उत्सव शहरातल्या गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी सार्वजनिक मंडळांनी काढलेल्या मिरवणुका एकापाठोपाठ सुरूच आहेत. अनेक मंडळांच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल, ताशा वाद्यांचा गजर असून काही मंडळांनी डीजेचा वापर करून वातावरणाला आधुनिक रंग दिला.
Pune police managing the crowd during the Ganesh Visarjan procession amidst tension caused by a DJ dispute.
Pune police managing the crowd during the Ganesh Visarjan procession amidst tension caused by a DJ dispute.esakal
Updated on

पुणे: पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत अलका चौकात काही प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेल्या मार्गावर थांबत डीजे वाजवण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. मागे असलेल्या अन्य मंडळांचे विसर्जन मिरवणूक यामुळे अडचणीत सापडले होते, आणि काही वेळेकरिता संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही मंडळ पुढे न सरकल्याने अखेर कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.