Ganesh Visarjan: पुण्यातील मिरवणूक अखेर संपली; गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीच तास लवकर सांगता

महाराष्ट्रात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ चालते, त्यामुळं हा विषय दरवर्षी चर्चेत असतो.
Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song
Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song esakal
Updated on

पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक अखेर संपली असून २८ तास ३० मिनिटांच्या काळानंतर या मिरवणुकीची सांगता झाली आहे. महाराष्ट्रात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ चालते, त्यामुळं हा विषय दरवर्षी चर्चेत असतो. मिरवणुका निर्विघ्न आणि शांततेत पार पाडावी हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं. (Pune Ganesh Visarjan procession finally ends 28.30 hours to take year in 2023)

Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song
Dasara Melava: शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा कोणाचा? शिंदे आणि ठाकरे गटाकडून अर्ज, प्रशासना पुढे पेच

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, "यावर्षी २८ तासांहून थोडी जास्त काळ यंदाचा मिरवणूक चालली. काल अकरा सव्वा अकरा वाजता मिरवणूक सुरु झाली होती, ती आज ३ वाजता मिरवणूक संपली आहे. यंदाच्या मिरवणुकीतलं वैशिष्ट्य असं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची जी मिरवणूक होती ती, ती संध्याकाळी ४ वाजता काढण्याचं ठरवलं होतं त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलं. त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता या गणपतीचं विसर्जन देखील झालं"

Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song
Virender Sehwag : दबाव टाळायचा असेल तर... धोनी - कर्स्टनचे उदाहरण देत विरूने रोहित सेनेला दिला मोलाचा सल्ला

पहिल्या अन् शेवटच्या गणेशाचं कधी झालं विसर्जन?

दरम्यान, या विसर्जन मिरवणुकीतला पहिला गणपती म्हणजे कसबा गणपतीची मिरवणूक सुरु झाली. त्यानंतर शेवटचा गणपती महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेशाचं विसर्जन झालं. कसबा गणपतीचं विसर्जन चतुर्दशीला दीड वाजण्याच्या सुमारास झालं. (Latest Marathi News)

तर महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात आज दुपारी ३.१० वाजता झालं. यानंतर पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची अधिकृतरित्या सांगता झाली.

Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song
Mumbai Diaries 2 : २६ नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं होतं? 'मुंबई डायरीज'चा थरकाप उडवून देणारा ट्रेलर!

गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीच तास लवकर संपली मिरवणूक

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अडीच तास लवकर संपली. गेल्यावर्षी मिरवणूक संपायला ३१ तासांचा कालावधी लागला होता. यंदा ही मिरवणूक २८ तास ३० मिनिटे चालली. मिरवणूक लवकर संपणं हे श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळामुळं शक्य झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

कारण दरवर्षी मध्यरात्री सुरु होणारी या मंडळाची मिरवणूक यंदा दुपारी ४ वाजता सुरु झाली आणि पावणे नऊ वाजता संपली. या गणेशाच्या विसर्जनानंतर इतर मंडळानं वेगानं पुढे नेलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.