Pune Ganeshotsav : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा देखावा ठरला प्रेक्षकांच्या आवडीचा

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखाव्याचे कौतुक
pune
punesakal
Updated on

कॅन्टोन्मेंट: कॅम्प भागतील अत्रे चौक येथे श्री शिव तरूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षण हे वाघीणी चे दुध आहे, हा सामाजिक जीवंत देखावा सादर केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंडळाला भेट देत देखाव्याचे भरभरून कौतुक केले.

देखाव्याच्या माध्यमातून शासनाने विद्यार्थ्यांना पदवी मिळेपर्यंत शिक्षण मोफत करण्याची मागणी ही करण्यात आली. या देखाव्यात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अबुल या कलाम या महापुरुषांची वेशभूषा कलावंतांनी परिधान करून अतिशय सुंदररित्या त्यांचे विचार यामध्ये मांडले आहे.

गरीब व गरजू विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालयीन प्रवेश मिळविण्यासाठी होणारी फरफड, कुटुंबीयाची होणारी आर्थिक चणचण व त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या वाटेवर जात असल्याचे दर्शन यादेखाव्यातून घडविण्यात आले. त्यामुळे त्या भागात हा देखावा प्रेक्षकांच्या आवडीचा विषय ठरला आहे.

pune
Pune Accident News : पुण्यात भरधाव कारने पाच शेतमजूरांना चिरडलं! तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

यामंडळाची स्थापना सन 1976 साली करण्यात असून यंदा मंडळ 48 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मंडळाने सतत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे .हा देखावा साई मिडिया ॲड सलोशन ग्रुपने सादर केला आहे.

pune
Pune Festival 2023 : मुशायरामध्ये शेरो-शायरीची मेजवानी

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, अध्यक्ष उदय जाधव , कार्याध्यक्ष डॉली शिंदे, दीपक पायगुडे, नितीन म्हस्के, सुरेंद्र परदेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.

pune
Pune : नाणेघाटात आलेल्या बडोद्याच्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.