पुणे : गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवरही गुन्हा दाखल 

Pune Gangster Sharad Mohol has also been booked.jpg
Pune Gangster Sharad Mohol has also been booked.jpg
Updated on

पुणे  : कुख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढत केलेले शक्ती प्रदर्शन त्यांच्या अंगाशी आले आहे. त्या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर आता खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या गुन्ह्यातून शरद मोहोळ येरवडा कारागृहातून नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यानंतर एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी २६ जानेवारी रोजी त्याला बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ उपस्थित राहिला होता. त्यासह त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी आकडाआरडा करून दहशत निर्माम केली. त्यामुळे नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुंड शरद मोहोळ सह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती खडक पोलिसांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.