Pune: गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुण्यात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तसेच शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर पार्किंगची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत.
मिरवणूक कालावधीत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दोन दिवस शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. तसेच, मुख्य मिरवणूक मार्गांवर अग्निशामक दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथ वगळता अन्य वाहनांना बंदी राहील. बुधवारी मिरवणूक संपेपर्यंत हा आदेश लागू राहील.