Pune : कचरा प्रश्न, वाहतूक कोंडी, वाघोलीत ड्रेनेज तुंबून रस्त्यावर पाणी, दोनशे इंडस्ट्रीजला फटका

वाघोलीत अनेक ठिकाणी कचरा रस्त्यालगत, महामार्गालगत पडलेला दिसून येतो. हीच परिस्थीती पुढे रांजणगाव पर्यंत आहे.
Pune
Pune sakal
Updated on

वाघोली – कचरा प्रश्न, वाहतूक कोंडी, पावसाळ्यात ड्रेनेज तुंबून रस्त्यावर पाणी साचणे अशा अनेक मूलभूत असुविधा असल्याने वाघोली पासून रांजणगाव पर्यंत असणाऱ्या सुमारे दोनशे इंडस्ट्रीजला याचा फटका बसत आहे. जिल्हाधिकारी, पी एम आर डी ए व महापालिका यांना पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

Pune
Pune Fire: टिंबर मार्केटमध्ये आग आटोक्यात नाहीच, ४० गाड्या आणि १४० जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच

वाघोलीत अनेक ठिकाणी कचरा रस्त्यालगत, महामार्गालगत पडलेला दिसून येतो. हीच परिस्थीती पुढे रांजणगाव पर्यंत आहे. यामुळे डास,चिलटे यांचे प्रमाण वाढून आरोग्यास धोका निर्माण होतो. दर मंगळवारी आठवडे बाजार मुळे वाघोलीत प्रचंड वाहतूक कोंडी होते. आठवडे बाजार साठी मोठे मैदान असतानाही अनेक विक्रेते रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

Pune
Mumbai Drug Crime : इराणी वस्तीतून ड्रग लेडीला अटक

त्या विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे असताना कारवाई होत नाही. तुंबलेली गटारे पावसाळ्यापूर्वी स्वच्छ केली जात नसल्याने अनेक ठिकाणी पाणी महामार्गावर साचते परिणामतः वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शिक्रापूर येथेही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे कामगारांना सकाळी कंपनीत व सायंकाळी घरी पोहचण्यास उशीर होतो.

Pune
Mumbai Local Train : एसी लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी ! तिकीट तपासणी मोहीम सुरू

वाघोली हे महापालिका हद्दीत तर पुढील भाग रांजणगाव पर्यंत जिल्हा परिषद व पी एम आर डी ए अंतर्गत येतो. मात्र या तिन्ही संस्था मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकलचरने या प्रश्नाबाबत तिन्ही ठिकाणी लेखी अर्ज केले आहेत. मात्र याकडे अद्यापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

गुंतवणूक होणे अवघड

नगर रोड परिसरातील एम आय डी सी मध्ये इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार, पाहुणे येतात. मात्र त्यांना महामार्गाच्या दोन्ही बाजूला कचऱ्याच्या ढिगाचे दर्शन होते. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

यासह अनेक प्रश्न दिसून येतात. त्याचे वाईट पडसाद त्यांच्या भेटीवर पडतात. फाईव्ह स्टार एम आय डी सी म्हणवली जाते. मग ही स्थिती बघता कसे फाईव्ह स्टार म्हणणार. यामुळे ते गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत नाही. एम आय डी सी कडे जाणारे रस्ते व परिसर बघता क्षणीच प्रेमात पडावे असे असायला हवे असे मत अनेक उद्योजकांनी व्यक्त केले.

Pune
Non Veg Restaurant In Mumbai : मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे चविष्ट मांसाहारी जेवण कुठे खाण्यास मिळेल?

आम्ही मदत करण्यास तयार

अधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी एम आय डी सी चा परिसर व तिकडे जाणारे रस्ते चकाचक असायला हवे. आलेल्या परदेशी पाहुण्यांना प्रसन्न वाटायला हवे. सध्या महामार्गाच्या बाजूला सर्वत्र कचरा दिसून येतो. त्याचे वाईट पडसात पडतात. हा कचरा दिसू नये यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेने काम करायला हवे. प्राथमिक कचरा उचलण्यास आम्ही तयार आहोत. नंतर त्यांनी काळजी घ्यावी.

एच पी श्रीवास्तवा, उपाध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकलचर.

Pune
Mumbai Trans Harbour Link: ३०-३५ वर्षे केवळ चर्चा होती; हा पूल फक्त मोदींमुळे उभा राहिला, देवेंद्र फडणवीस

मूलभूत समस्या नकोच

उद्योगाना चालना देण्यासाठी अशा मूलभूत समस्या निर्माण व्हायलाच नको. उद्योग वाढले तर रोजगारही वाढेल. यामुळे एम आय डी सी चा परिसर स्वच्छ, सुंदर व वाहतूक कोंडी मुक्त हवा.

रथिन सिन्हा, अध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकलचर.

Pune
Mumbai Trans Harber Link : कधी पूर्ण होणार? फायदा कोणाला? जगातल्या 10 नंबरच्या सागरी पुलावर शिंदे-फडणवीस, Video Viral

उत्पादनावर परिणाम

वाघोली व शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी मुळे कामगाराना कंपनीत जाण्यासाठी उशीर होतो. त्याचा परिणाम उत्पादनावरही होतो. त्यामुळे या वाहतूक कोंडीवरही तोडगा काढणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.