Pune girl attack : योग्य वेळी समुपदेशन-संयमाची शिकवण हवीच; मानसोपचार तज्ज्ञांचे मत

Pune girl attack
Pune girl attack
Updated on

पुणे : मला जे हवे ते मी कसेही मिळविणारच, अशी प्रवृती आपल्या साथीदारावर हल्ला करण्याच्या घटनांना कारणीभूत आहे. त्यामुळे आपले पाल्य अशा मनस्थितीतून किंवा परिस्थितीतून जात असतील तर त्यांचे योग्य समुपदेशन व्हायला हवे. तसेच प्रेमसंबंध तुटले किंवा आणखी कोणताही प्रसंग आला तर त्यावेळी संयम बाळगला पाहिजे, अशी शिकवण मुलांना लहानपणापासूनच द्यायला हवी.

तसे झाल्यास अशा प्रकारच्या घटना कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी व्यक्त केला.

Pune girl attack
ST Bank : बँकेच्या प्रत्येक शाखेत फडणवीसांचे तैलचित्र लावण्याचे सदावर्तेंचे निर्देश; विजयानंतर सक्रिय

लहान मुले, तरुण किंवा ज्येष्ठ व्यक्ती असो. या तीनही वयोगटातील अनेक व्यक्तींना मला जे हवे ते मी मिळविणारच असे वाटण्याचे प्रमाण वाढले आहे. असे वाटायला लागले कारण आपल्या समाजात तेच घडत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या परिस्थितीतून जात असेल तर त्याचा मानसोपचाराच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मुलांमध्ये काही अनपेक्षित बदल पालिकांना लक्षात आले तर त्यांनी मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. घरात काय वातावरण आहे, याचा सकारात्मक व नकारात्मक परिमाण अशावेळी होतो. तर काहींना नाही न पचविण्याची मानसिक आजार देखील असू शकतो.

- डॉ. विद्याधर वाटवे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ

Pune girl attack
jayant patil: स्वतःला असं बघायला आवडेल..; प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत जयंत पाटलांचं सूचक विधान

मला जे हवे आहे ते कोणत्याही परिस्थितीत मिळाले पाहिजे, अशी मानसिकता मुलांमध्ये निर्माण होणार नाही यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आवश्‍यक असलेली सत्र घेणे गरजेचे आहे. वार्इट बाबींपासून दूर राहण्यासाठी काय करावे, याचे प्रशिक्षण मुलांना द्यावे. आपण प्रेमात पडलो आहोत की नाही? हेच अनेक मुला-मुलींना कळत नाही. विविध बाबींचे आकर्षण आणि प्रियकराकडून मिळणारी चांगली वागणूक याला भुलून देखील प्रेम केले जाते. त्यामुळे प्रेमाचा नेमका अर्थ समजून प्रेम केले गेले पाहिजे.

डॉ. सुजला वाटवे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ

प्रेमात पडल्यानंतर साथीदार एकमेकांवर हक्क गाजविण्यास सुरवात करतात. नुसत्या अपेक्षा ठेवणे व अट्टहास करणे यात फरक आहे. अपेक्षांचे रूपांतर अट्टहासात होते तेव्हा नात्यात समस्या निर्माण होतात. हक्क दाखविताना राग निर्माण होतो आणि त्याच रागाच्या भरात आपल्याच साथीदारावर हल्ला करण्यासारखे प्रकार होतात. लहानपणापासून

नकार ऐकायची सवय नसेल तर त्या व्यक्तींना सहजासहजी नकार पचवता येत नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांना नकार पचविण्याची सवय असायला हवी, याची काळजी पालकांनी घ्यावी.

- स्मिता जोशी, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.