Pune Viral News : पुण्याच्या लेकीनं अमेरिकेत उभारली 75 हजार कोटींची कंपनी, सेल्फ-मेड पॉवरफुल महिलांमध्ये समावेश

पुण्यात वाढलेल्या या लेकीने फोर्ब्सच्या अमेरिकेतल्या सगळ्या श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
Pune Viral News
Pune Viral Newsesakal
Updated on

Pune Girl In List Of Forbes Richest Self-Made Women In America : पुण्याची लेक असलेली उद्योजिका नेहा नारखेडे आता अमेरिकेतल्या सगळ्यात यशस्वी महिलांमध्ये ओळखली जाते. अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत महिला उद्योजकांमध्ये तिचा समावेश होतो. पुण्याच्या नेहा नारखेडेला मागच्या महिन्यात फोर्ब्सने अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत समाविष्ट केले.

नेहाचं नेटवर्थ

नेहाचं नेटवर्थ ५२० मिलीयन डॉलर म्हणजे साधारण ४२ कोटी रुपये आहे. क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या काँफ्लूएंट या सॉफ्टवेअर कंपनीची को फाउंडर आणि बोर्ड मेंबर आहे. काँफ्लूएंटचे व्हॅल्युएशन ९.१ बिलीयन डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांचे आहे.

Pune Viral News
Viral News: एका ‘खास’ लग्नाची गोष्ट; फोटो पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल

नेहाची कहाणी

नेहा पुण्यातच लहानाची मोठी झाली. २००६ मध्ये मास्टर्सचे शिक्षण घेण्यासाठी नेहा अमेरिकेत गेली. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्। ऑरेकलमध्ये टेक्निकल स्टाफ म्हणून काम केलं. त्यानंतर लिंकडीनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले. एका वर्षातच प्रमोशन मिळून सिनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर बनवण्यात आले. त्यानंतर एक वर्षांनंतर त्यांना प्रिंसिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून प्रमोशन मिळाले.

शिवाय नंतर स्ट्रीम इंफ्रास्ट्रक्चर लीड बनली. तिथे नेहा आणि टीमने एक ओपन सोर्स मॅसेजिंग सिस्टम अॅप डेव्हलप केले, याद्वारे साइटचा डेटा हँडल केला जात होता.

Pune Viral News
Unique Record Viral News : किती मजा..! आई-वडिलांसह 7 मुलांचाही वाढदिवस एकाच दिवशी, कसा?

नेहा आणि दोन सहकाऱ्यांनी लिंकडीनचा जॉब २०१४मध्ये सोडला आणि काँफ्लूएंट सुरु केले. ही क्लाउड सोल्युशन देणाऱी कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळ्या कंपनींना मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करण्यासाठी मदत करते. नेहा पाच वर्ष कंपनीची चीफ टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट ऑफीसर होती. सध्या ती कंपनीची बोर्ड मेंबर आहे.

शिवाय नेहाने २०२१ मध्ये ऑसिलर नावाची एक कंपनी सुरू केली. या कंपनीची ती सीईओ आहे.

वडिल प्रेरणास्थान

नेहाने सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या या यशातत वडिलांचा मोठा हात असल्याचे सांगितले. तिने सांगितले की, वडिल तिच्यासाठी पुस्तके आणत आणि अशा महिलांच्या गोष्टी सांगत ज्या मोठ्या हुद्द्यावर आहेत. इंदिरा गांधी, इंद्रा नूयी, किरण बेदी अशा महिलांच्या गोष्टींमधून तिला प्रेरणा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.