Pune Girl Student Attack: पुण्यातील 'त्या' सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल अन् हर्षद म्हणाले...

जीवघेण्या कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या या MPSC करणाऱ्या दोघां तरुणांचं सर्वस्तरातून कौतुक होतं आहे.
Pune Girl Student Attack: पुण्यातील 'त्या' सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल अन् हर्षद म्हणाले...
Updated on

पुण्यातील मध्यवस्तीत एका कॉलेज तरुणीला कोयत्याच्या जीवघेणा हल्ल्यातून वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. फोनवरुन फडणवीसांनी या दोघांशी संवाद साधला. (Pune Girl Student Attack HM Fadnavis call to superheroes in Pune Leshpal Javalge and Harshad Patil)

Pune Girl Student Attack: पुण्यातील 'त्या' सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल अन् हर्षद म्हणाले...
Saurabh Tripathi: निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचं निलंबन मागे; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा संवाद घडवून आणला. जगदीश मुळीक यांच्या फोनवरुन फडणवीसांनी लेशपाल आणि हर्षद या दोघांशी फोनवरुन संवाद साधला. दोन्ही जिगरबाज तरुणांनी सजग नागरिक म्हणून दाखवलेलं धाडस प्रशंसनीय आहे, या शब्दांत फडणवीसांनी दोघांवरही कौतुकाची थाप टाकली. (Latest Marathi News)

लेशपाल आणि हर्षद काय म्हणाले?

गृहमंत्री फडणवीसांनी स्वतःहून फोन करुन कौतुक केल्यानं लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्याशी बोलल्यानं खूपच छान वाटलं अशा शब्दांत लेशपालनं आनंद व्यक्त केला. (Marathi Tajya Batmya)

Pune Girl Student Attack: पुण्यातील 'त्या' सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल अन् हर्षद म्हणाले...
'तो' अपघात नव्हताच! मूल होत नव्हतं म्हणून पत्नीला कारमध्येचं पेटवलं; घटनेने राज्यात खळबळ

नेमकं प्रकरण काय?

एकतर्फी प्रेमातून एका वीस वर्षाच्या तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर तरुणानं दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावरुन हातात कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत होता. या धावपळीत तरुणी रस्त्यावर खाली पडली तिच्या डोक्यात हल्लेखोर तरुण वार करणार इतक्यात तिथं जवळचं असलेला एमपीएससीचा अभ्यास करणारे तरुण लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील त्या मुलीच्या मदतीला धावले आणि लेशपालनं हल्लेखारोचा कोयता असलेला हात वरच पकडून ठेवला.

त्यामुळं संबंधित मुलीचा जीव वाचला. त्यानंतर इतरही लोक त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळं पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. पण त्याचबरोबर लेशपाल आणि हर्षद या तरुणांनी दाखवलेल्या मोठ्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.